धरणगावात दशलक्षण पर्वाची भक्तीमय सांगता - २४ तीर्थंकर महापूजा व जलयात्रा महोत्सव थाटात संपन्न विकास पाटील धरणगाव : (संपादक : हेमकांत गाय...
धरणगावात दशलक्षण पर्वाची भक्तीमय सांगता - २४ तीर्थंकर महापूजा व जलयात्रा महोत्सव थाटात संपन्न
विकास पाटील धरणगाव :
(संपादक : हेमकांत गायकवाड\)
धरणगाव : येथील दिगंबर जैन समाजातर्फे दशलक्षण पर्व समाप्ती निमित्त दोन दिवसीय धार्मिक सोहळा दि. २ व ३ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दहा दिवस चाललेल्या या पर्व काळात मंदिरात नित्य अभिषेक, पूजन, पाठशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्रत आणि उपवास करण्यात आले,व विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे व पाठशाळेचे सुंदर आयोजन सौ. सुलभा लाड यांनी अत्यंत उत्तम प्रकारे केले. दि. २ ऑक्टोबर रोजी २४ तीर्थंकरांची भव्य महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. ही महापूजा व महाप्रसाद धर्मानुरागी श्रीमती कल्पना अनिल डहाळे, स्वप्नील डहाळे डॉ.श्वेता डहाळे पुणे परिवारातर्फे देण्यात आला. दि. ३ ऑक्टोबर रोजी भव्य जलयात्रा महोत्सव व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रथोत्सव मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात युवकांनी लेझीम पथकासह नृत्य सादर केले तर महिलांनी भगवान महावीर चौकात गरबा नृत्य खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रथोत्सवात मालमनोहरची बोली घेणारे चि. अयांश प्रिंतेश जैन ह्याची मिरवणूक घोड्यावरून काढण्यात आली. या दिवशीचा महाप्रसाद धर्मानुरागी अजय महाजन, प्रणिता महाजन,शलाका,श्रद्धा व पुष्कर महाजन जळगाव यांच्यातर्फे देण्यात आला.
या सोहळ्यासाठी बेंगलोर, मुंबई, पुणे, नागपूर, वर्धा, भडगाव, पारोळा, जळगाव,धुळे,बेटावद,एरंडोल येथील असंख्य भाविक उपस्थित होते. तसेच सांस्कृतिक स्पर्धांचे बक्षीस वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यात्री निवासासाठी धर्मानुरागी पियूष जैन, श्रद्धा जैन व श्रीमती रंजना महाजन यांनी दोन खोल्यांसाठी देणगी जाहीर केल्याबद्दल त्यांचा सत्कार श्री. दिपकजी लाड,लिझा जैन व सौ. प्राजक्ता लाड यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदिराचे अध्यक्ष राहुल जैन यांनी तर आभार प्रतीक जैन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, जैन उत्सव मंडळ, राजुलमती महिला मंडळ व तरुण कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

No comments