adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुलींचा सहभाग

  जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुलींचा सहभाग भरत कोळी यावल   (संपादक : ...

 जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात

१४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुलींचा सहभाग



भरत कोळी यावल  

(संपादक : हेमकांत गायकवाड\)

यावल : व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल, यावल येथे सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

या क्रीडा स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या दिपाली धांडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून के. यू. पाटील सर, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक तसेच यावल संघाचे अध्यक्ष आणि यावल तालुक्याचे क्रीडा समन्वयक दिलीप सोंगेले सर उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील विविध शाळांचे क्रीडा शिक्षकही उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या दिपाली धांडे यांनी केले. क्रीडा स्पर्धेबाबतची माहिती राजश्री लोखंडे यांनी दिली, तर के. यू. पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

या स्पर्धेत यावल तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. सहभागी खेळाडूंचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका रंजना महाजन यांचीही उपस्थिती लाभली.

स्पर्धेत प्रियंका सुरवाडे व आकाश सुरवाडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी भिरूड यांनी केले, तर आभार प्रदर्शन सरोज येवले यांनी मानले.

क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीतील सर्व सदस्य, विद्यार्थी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकार्यामुळे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.

No comments