adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर नगरपरिषदेत खळबळ! भूखंडाच्या बिन शेती वरून तक्रार; गिरिश सराफ यांच्यासह इतरांना ७ दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश! फैजपूर नगरपरिषदेचा दणका! भूखंडाच्या बिनशेती चा वाद ऐरणीवर; खुलासा द्या, अन्यथा पुढील प्रशासकीय कारवाईला सामोरे जा!

फैजपूर नगरपरिषदेत खळबळ! भूखंडाच्या बिन शेती वरून तक्रार; गिरिश सराफ यांच्यासह इतरांना ७ दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश! फैजपूर नगरपरिषदेच...

फैजपूर नगरपरिषदेत खळबळ! भूखंडाच्या बिन शेती वरून तक्रार; गिरिश सराफ यांच्यासह इतरांना ७ दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश!

फैजपूर नगरपरिषदेचा दणका! भूखंडाच्या बिनशेती चा वाद ऐरणीवर; खुलासा द्या, अन्यथा पुढील प्रशासकीय कारवाईला सामोरे जा!



इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


फैजपूर नगरपरिषदेत भूखंडाच्या बिनशेती चा हक्कावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. नगरपरिषदेच्या गट क्रमांक १, 982/2संदर्भातील भू-अभिन्यास मंजुरीबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने संबंधितांना खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

नगरपरिषदेने श्री. गिरिश प्रल्हाद सराफ व इतरांना पाठविलेल्या अधिकृत पत्रानुसार, पत्र प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत लेखी खुलासा आणि संबंधित आवश्यक कागदपत्रे नगरपरिषद कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे.

या प्रकरणात नगरसेविका सुमय्या बी. शेख कुर्बान यांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी तक्रार अर्ज दाखल केल्याचा पत्रात उल्लेख आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासनाने संबंधितांकडून खुलासा मागविला आहे.

विशेष म्हणजे, विहित मुदतीत खुलासा आणि कागदपत्रे सादर न केल्यास उपलब्ध अभिलेखांच्या आधारे पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असेही नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.

आता या प्रकरणात संबंधितांकडून काय खुलासा सादर केला जातो आणि नगरपरिषद प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे फैजपूर शहराचे लक्ष लागले आहे.

भूखंडाच्या बिनशेती चा वाद नेमका काय? तक्रारीत कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत? आणि पुढील कारवाई काय होणार? या प्रश्नांची उत्तरे आता खुलाशानंतरच स्पष्ट होतील.

No comments