adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुर्लीत श्री दुर्गादेवी मित्र मंडळातर्फे यशस्वी आरोग्य शिबिर संपन्न; २०० रुग्णांची तपासणी

अंतुर्लीत श्री दुर्गादेवी मित्र मंडळातर्फे यशस्वी आरोग्य शिबिर संपन्न; २०० रुग्णांची तपासणी अंतुर्ली प्रतिनिधी:किरण धायले (संपादक : हेमकांत ...

अंतुर्लीत श्री दुर्गादेवी मित्र मंडळातर्फे यशस्वी आरोग्य शिबिर संपन्न; २०० रुग्णांची तपासणी



अंतुर्ली प्रतिनिधी:किरण धायले

(संपादक : हेमकांत गायकवाड)


प्राथमिक आरोग्य केंद्र अंतुर्ली ता. मुक्ताईनगर च्या वतीने पाटील वाडा येथील श्री दुर्गादेवी मित्र मंडळात आयोजित मोफत आरोग्य शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात परिसरातील एकूण २०० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार देण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साही वातावरणात झाली. या शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, इतर रक्त तपासणी मोफत करण्यात आली आणि माता व बालकांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी ‘आयुष्मान भारत कार्ड’ देखील ऑनलाईन काढून देण्यात आले, ज्याचा लाभ अनेक ग्रामस्थांनी घेतला. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या दारात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणारा हा स्तुत्य उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असून, यामुळे आरोग्याविषयी जनजागृती निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे.

या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पाटील यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक सुनील पाटील, आनंदा ठाकरे, समुदाय आरोग्य अधिकारी भूषण देव, आरोग्य सेवक पवन बोधडे, सुनील वानखडे, प्रल्हाद राठोड, आरोग्य सेविका श्रीमती अनिता पेंदुर, सुनीता चौकटे, वाहन चालक दीपक दुट्टे, युवा स्वयंसेवक आयुष दुट्टे, परिचार सौरभ चौधरी आणि आशाताई स्वयंसेविकांनी अत्यंत समर्पितभावाने सेवा बजावली.

तसेच, श्री दुर्गादेवी मित्र मंडळातर्फे राजू तराळ, सुनील पाटील, जोशी बाबा आणि इतर ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. आरोग्य विभागाची संपूर्ण टीम आणि ग्रामस्थांच्या या लोकोपयोगी व सढळ सहकार्यामुळे हा आरोग्य मेळावा अतिशय यशस्वीरीत्या पार पडला.

No comments