कास्ट्राईबचे ४६ वे राज्यस्तरीय अधिवेशन १९ आक्टोंबरला नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; शिक्षणमंत्री दादाजी भु...
कास्ट्राईबचे ४६ वे राज्यस्तरीय अधिवेशन १९ आक्टोंबरला नागपुरात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर होणार चर्चा.
अरुण धनगर जळगाव
[संपादक - हेमकांत गायकवाड]
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने ४६ वे राज्यस्तरीय अधिवेशन सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर येथील कुसुमताई वानखेडे भवन, उत्तर अंबाझरी रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, शिक्षणमंत्री दादाजी भुसे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. महासंघाचे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या अधिवेशनात राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. पदोन्नतीतील आरक्षण, आरक्षणाचा अनुशेष, जुनी पेन्शन योजना, वेतनातील त्रुटी आणि कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. या प्रश्नांवर शासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असल्याने अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अधिवेशन च्या पूर्व तयारीसाठी जळगांव कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची बैठक नुकतीच सोमवार रोजी पार पडली अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी सर्व जिल्ह्यांमधील कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी, सभासद आणि कर्मचाऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जळगांव कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. याबाबतची माहिती महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे, जिल्हाध्यक्ष पुलकेशी केदार यांनी दिली. यावेळी महासंघाचे योगेश अडकमोल, कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष, विज्ञान सैंदाणे सर ,कास्ट्राईब पाटबंधारे कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष सचिन सपकाळे, जिभाऊ हटकर, प्रा.प्रमोद लोंढे, रवींद्र गायकवाड कोषागार विभागाचे, विवेक गोंधळी, सुरेश भालेराव ,अजय बोरसे, निलेश चऱ्हाटे, मनोज तडवी, दत्ता साळी, नंदू गायकवाड, किशोर मैराळे, महेश सपकाळे, सुनील खराटे, राकेश निकुंबे, रोहित पावरा, एस. डी. बनगे, इत्यादी उपस्थित होते.

No comments