adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वनोली श्री साईबाबा मंदिरात भाविकांसाठी18 ऑक्टोबररोजी महाप्रसाद

 वनोली श्री साईबाबा मंदिरात  भाविकांसाठी18 ऑक्टोबररोजी  महाप्रसाद    भरत कोळी यावल  [संपादक - हेमकांत गायकवाड] श्रीक्षेत्र साईबाबा मंदिर वनो...

 वनोली श्री साईबाबा मंदिरात  भाविकांसाठी18 ऑक्टोबररोजी  महाप्रसाद   



भरत कोळी यावल 

[संपादक - हेमकांत गायकवाड]

श्रीक्षेत्र साईबाबा मंदिर वनोली येथे  आश्विन शुद्ध सप्तमीदिनांक 18 ऑक्टोबर 26 रविवार रोजी या दिवशी श्री साईबाबा मंदिराचा महाप्रसाद संध्याकाळी आठ ते रात्री उशिरा पावे तो आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला भाविकांनी महाप्रसादासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन साईबाबा संस्थान अध्यक्ष  हिरालाल व्यंकट चौधरी आणि  ट्रस्टी गावचे माजी सरपंच उपसरपंच सर्व संचालक मंडळ विका सहकारी सोसायटीची चेअरमन संचालक मंडळ व वनोली ग्रामस्थ यांनी केले आहे आश्विन शुद्ध सप्तमी नंतर रोजी घटस्थापनेनुसार आठव्या दिवशी साईबाबा मंदिरातमहाप्रसादाचा कार्यक्रम दिनांक 18 ऑक्टोबर रोजीआयोजित करण्यात आला आहे . यावेळी सुमारे 25 ते 30 हजाराच्या वर भाविक महाप्रसादाला हजेरी लावतीलतशी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे . प्रशासनातर्फे बंदोबस्त ठेवण्यात येतो भाविकांनी शिस्तीने प्रसाद घ्यावा व मंदिर ट्रस्ट समिती व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल व्यंकट चौधरी यांनी केले आहे दुसऱ्या दिवशी दिनांक 19 ऑक्टोबर सोमवार रोजी साईबाबा मंदिराची यात्रा संपन्न होईल

 या दिवशी सव्वाशे फूट उंच देवकाठी धुण्यासाठी  नेण्यात येते तिथून काठीचे स्नान करून तिला सजवून वाजत गाजत गावात आणली जाईल डफांच्या वाजंत्री ने ग्रामस्थ एका हातात सजवलेली काठी नाचवतात .संध्याकाळी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो व रात्रीनेहमीच्या परंपरेनुसार लोकनाट्य तमाशा मंडळ करमणुकीसाठी ठेवण्यात येतो  श्री साईबाबा महाराज शिर्डी येथे जात असताना वनोली गावी या मंदिराच्या ठिकाणी थांबले त्यावेळी त्यांच्या हस्ते शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती म्हणूनच या मंदिराला साईबाबा महाराजांचे नाव देण्यात आले आहे अशी आख्यायिका आहे या ठिकाणी भक्तगण मानता मानतात गोडेतेल नारळ मंदिरात अर्पण करीत असतात सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी दुष्काळ पडला होता त्या ठिकाणी मंदिरात महाराजांनी दोन नंदादीप तेलाने लावले होते . ते आजही जळतात त्यावेळी तेल उपलब्ध नव्हते महाराजांनी पाण्यावर दीपक जाळले होते . त्या दिवसापासून अखंड ज्योत या दिव्याची सुरू असून तेल कधीही खुटत नाही . दहा फूट खोल आणि दहा फूट रुंद अशी टाकी या ठिकाणी मंदिरात बांधण्यात आलेली आहे . त्यात भक्तगण नवस म्हणून तेल आणतात होती संग्रहित होत . तेच तेल दिव्यांमध्ये वापरले जाते व महाराजांचा जो प्रसाद केला जातो त्यावेळी लागणारे तेल इथूनच वापरले जाते सुमारे 40 ते 50 हजाराच्या वर भाविक दरवर्षी दर्शनाला येतात तर महाप्रसादासाठी वनोली कोसगाव दुसखेडा म्हैसवाडी पाडळसा बामनोद विरोदा आमोदा रिधोरी मांगी करंजी वडोदा सावदा कासवा अकलूद फैजपूर सावदा पिंपरूड येथून भाविक महिलास्वयंपाकासाठी मदत करतात व रात्री महाप्रसादाचे वेळी परिसरातील तरुण वर्ग सहकार्य करतात . 


महाप्रसादामध्ये साखरेची खीर पोळ्या गंगाफळ ची भाजी  भाविकांना दिले जाते व उळीदाच्या डाळीचे वडे तळलेले स्वयंपाकात केले जातात या ठिकाणी भाविक गण साहित्य रूपाने सुद्धा देणगी आणून देतात व कार्यक्रम हिरीरीने पार पाडतात .  युतीचे माजी खासदार तथातत्कालीनआमदार कृषी मित्र स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे खूप योगदान लाभले आहे . तर राज्याचे मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन  केंद्रीय  मंत्री नामदार रक्षाताई खडसे राज्याचेमंत्री नामदार गुलाबराव पाटील  यांनी अनुदानाच्या रूपाने मोठे सहकार्य केलेले आहे . विकास काम आता जे मिळालेत त्यासाठीयावल रावेर विधानसभा आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांचे मोलाचे हातभार लागला असून आता नामदार गिरीश भाऊ च्या माध्यमातून 90 लक्ष रुपयाचे काँक्रिटीकरण पेव्हर ब्लॉक तर पंधरा लाख रुपये अमोल भाऊंकडून - दोन कोटी सभा मंडप गटार संरक्षण भिंत आणि इलेक्ट्रिकल साठी असे ना . गिरीश भाऊ महाजन कडून व भक्तनिवास साठी पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील योचे कडून निधी उपलब्ध झाला . सदर कार्यक्रमात आरोग्य विभाग वीज मंडळपोलीस विभाग सहकार्य करतात.तर पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर  प्रसादा नंतर हात धुण्यासाठी व पिण्यासाठी लावले जातात . वनोली या गावी जाण्यासाठी पाडळसे कोसगाव वनोली तसेच बामणोद वनोली असा रस्ता सुस्थितीत असून भाविकांनी शिस्तीने व नियमाने रहदारीत अडथळा होणार नाही याची काळजी घेत सहकार्य कराव असे आवाहन श्री साईबाबा मंदिर ट्रस्ट समितीचे विश्वस्त हिरालाल भाऊ चौधरी यांच्यातर्फे करण्यात आले आहे .

No comments