adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आमोदा तलाठी जळगाव एसीबीच्या जाळ्यात एक हजार रुपयाची लाच घेताना अटक

 आमोदा तलाठी जळगाव एसीबीच्या जाळ्यात एक हजार रुपयाची   लाच घेताना अटक इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथून जवळच असल...

 आमोदा तलाठी जळगाव एसीबीच्या जाळ्यात एक हजार रुपयाची  लाच घेताना अटक

इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथून जवळच असलेल्या आमोदा गावातील सातबारा उताऱ्यावर कूप नलिकेची करण्यासाठी तडजोडीअंती एक हजारांची लाच मागून स्वीकारताना यावल तालुक्यातील आमोदा तलाठ्याला जळगाव एसीबी अटक केली आहे या कारवाईने महसूल वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे एकीकडे जळगाव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकरी आधीच अडचणीत असताना आता महसूल प्रशासनातील लाचखोर शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा प्रकारही यातून समोर आला आहे. 

तक्रारदार हे शेतकरी असून त्यांच्या सातबारा उताऱ्यावर कुपनलिकेची नोंद करण्यासाठी आमोदा तलाठी शैलेश झोटे यांनी लाच मागितली होती तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला मंगळवारी ठरल्याप्रमाणे लाच रक्कम देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदार आमोदा ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला असलेल्या कार्यालयाजवळ आले असता तलाठी झोटे यांनी लाच स्वीकारली. पथकाला तक्रारदाराने इशारा करताच आरोपी तलाठ्याला अटक करण्यात आली या कारवाईने आमोदासह यावल तालुक्यातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे व सहकाऱ्यांनी  कारवाई केली

No comments