adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एच आर पृथ्वीराज सैंदाणे निसर्गोपचार तज्ञांचा बुलडाणा जिल्ह्यात " निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

  एच आर पृथ्वीराज सैंदाणे निसर्गोपचार तज्ञांचा बुलडाणा जिल्ह्यात  " निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आ...

 एच आर पृथ्वीराज सैंदाणे निसर्गोपचार तज्ञांचा बुलडाणा जिल्ह्यात

 " निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले



प्रतिनिधी रविंद्र कोळी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा तालुक्यातुन निसर्गोपचार तज्ञांचा बुलडाणा जिल्ह्यात गौरव; भ्रातृमंडळ हाॅल मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा.

दिनांक ४ ऑक्टोबर २०२६. रोजी बुलडाणा येथील भ्रातृमंडळ हाॅल येथे आयुष इंटरनॅशनल मेडीकल असोशिएशन ( AIMA /AGMA) व निसर्गोपचार चिकित्सक असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निसर्गोपचार क्षेत्रातील कार्य करत्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील निसर्गोपचार तज्ञांचा उपस्थितीत जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एच आर पृथ्वीराज सैंदाणे हे गेले १५ वर्षा पासून आपल्या भागात निसर्गोपचाराने प्रत्येक आजारांचे निदान करत आहेत. हजारो रूग्णान्वरती त्यांनी निसर्गोपचाराच्या माध्यमातून उपचार केलेत आणि ते खान्देशातील चोपडा आदिवासी भागात निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार करत असतात. त्यांच्या कार्याची दखल आयुष इंटरनॅशनल मेडीकल असोशिएशन, आणि आयुष ग्लोबल मेडीकल असोशिएशन ने घेतली आणि त्यांना बुलडाणा जिल्ह्यात निसर्गोपचार क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल  

"निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

या सन्मान सोहळ्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील आमदार संजयभाऊ गायकवाड आणि नगराध्यक्षा सौ. पुनम ताई गायकवाड, डाॅ.सचिन सुपे, डाॅ. त्रिदिप गुहा, डाॅ. प्रशांत कपाले, गंगाप्रसाद खरात यांची उपस्थिती होती तसेच मंचावर AIMA चे व्हाईस प्रेसिडेंट नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष बाबुराव कानडे, सौ. दिशा चव्हाण, विजय नवल पाटील, विनोद ढोबळे, रावसाहेब घोडेगांव,या सह अनेक मांन्यवर उपस्थित होते. निसर्गोपचार क्षेत्रात सातत्याने केलेल्या कार्याबद्दल एच आर पृथ्वीराज सैंदाणे यांचा कार्या मुळे समाजात निसर्गोपचारा बाबत जागरूकता वाढत असुन ग्रामीण भागातील अनेकांना आरोग्यदायी जिवन शैलीचा मार्ग मिळत आहे. अशी भावना या वेळी व्यासपीठावर व्यक्त करण्यात आली. 

सन्मान हा निसर्गोपचार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची पावती असुन त्यांच्या आगामी कार्या साठी शुभेच्छांच्या वर्षाव करण्यात आला.

No comments