adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पोलीस दलात सामील होऊ इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी विशेष मार्गदर्शन

 *पोलीस दलात सामील होऊ इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी विशेष मार्गदर्शन*       *भुसावळ उपविभागाचे उपअधीक्षक केदार बारबोले* *लियाकत शाह जळगांव* ...

 *पोलीस दलात सामील होऊ इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी विशेष मार्गदर्शन* 


     *भुसावळ उपविभागाचे उपअधीक्षक केदार बारबोले*

*लियाकत शाह जळगांव*

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

आगामी महाराष्ट्र पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर, जळगावच्या पोलीस अधीक्षकांनी भुसावळ उपविभागातील इच्छुक तरुण-तरुणींसाठी एक विशेष उपक्रम आयोजित केला आहे. हे सत्र गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता भुसावळ येथील रेल्वे मैदानावर होईल.

या सत्रात अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, लेखी परीक्षेची तयारी आणि शारीरिक तपासणी याबद्दल माहिती दिली जाईल. वरिष्ठ पोलीस अधिकारी शंकांचे निरसनही करतील. या संधीचा लाभ घेण्यासाठी भुसावळ आणि परिसरातील सर्व इच्छुक उमेदवारांनी दुपारी ३:४५ पर्यंत उपस्थित राहावे, अशी विनंती आहे. हे आवाहन भुसावळ उपविभागाचे उपअधीक्षक केदार बारबोले यांनी केले आहे.

No comments