adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते के. रवि दादांचा वाढदिवस अरबी समुद्रात बोटीवर अनोख्या अंदाजात साजरा!

 *ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते के. रवि दादांचा वाढदिवस अरबी समुद्रात बोटीवर अनोख्या अंदाजात साजरा!* *अभिनेते विश्वजीत सोनी, सोशल अ‍ॅक...

 *ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते के. रवि दादांचा वाढदिवस अरबी समुद्रात बोटीवर अनोख्या अंदाजात साजरा!*

*अभिनेते विश्वजीत सोनी, सोशल अ‍ॅक्टिव्हिस्ट जमील चिश्ती, नासिर पठान, सी. व्ही. कुलकर्णी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित.*

*अंकुश गायकवाड*

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते के. रवि (दादा) हे प्रत्येक काम अनोख्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने करण्यासाठी ओळखले जातात. 

यावेळीही त्यांनी आपला वाढदिवस एका वेगळ्याच अंदाजात, सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन साजरा केला. 'इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट'चे मॅनेजिंग डायरेक्टर के. रवि (दादा) यांनी मुंबईत अरबी समुद्रात, रतन टाटा यांच्या ताज पॅलेस हॉटेलसमोर बोटीवर आपला वाढदिवस साजरा केला.

या बर्थडे पार्टीत 'भाभी जी घर पर हैं' फेम अभिनेते विश्वजीत सोनी देखील उपस्थित होते, ज्यांना बॉलिवूडमध्ये ज्युनियर प्रेम चोप्रा म्हणूनही ओळखले जाते. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून ही विशेष बोट आपल्या सफरीवर निघाली आणि एका म्युझिकल जर्नीमध्ये बदलली. 

मुंबईचे ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते जमील चिश्ती मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच नासिर पठान, कुलकर्णी, अरुण वडनेरे, नितीन पाटील, प्रकाश दुपारगुडे, यशवंत मेंगजी, प्रद्युम्न थोरात, कण्णू यादव, रमाकांत मुंडे, गायक मंगेश कुमार, वकील यशवंत गंगावने , डान्सर संगीता माने , राजा भाऊ, ॲडवोकेट अशोकानंद यादव यांच्यासह अनेक पाहुणे दादांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते.

के. रवि दादांच्या  

वाढदिवसाच्या बोटीत लाटांच्या मस्तीत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सर्वांनी नाचत, गात आणि भरपूर खात-पित आनंद घेतला. या बोटीच्या सफरीत मोठ्या संख्येने मीडियाकर्मीही सहभागी झाले होते. शानदार हेलिकॉप्टर रुपी केक कापून के. रवि दादांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बोटीवर उत्तम जेवण आणि गाण्यांसोबत डान्सचा सिलसिला सुरूच होता, ज्यामध्ये के. रवि ही डान्सचा जलवा पाहुण्यांना पाहायला मिळाला.

आलेल्या पाहुण्यांनी के. रवि दादांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की, गरिबांची सेवा करणे हा दादांचा नेहमीच धर्म राहिला आहे. ते गरिबांचे आणि गरजवंतांचे नेहमिच वाली आहेत आणि त्यांनी सतत मदत केली आहे व करतही असतात. त्यांच्यासारखा दरियादिल माणूस मिळणे कठीण आहे, जो इतरांसाठी इतका चांगला आणि सकारात्मक विचार करतो.

के. रवि दादांनी या आनंदाच्या प्रसंगी सांगितले की, "मी नेहमीच नवीन गोष्टी आणण्याचा आणि रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न करत आलो आहे , मी लोकांना खुश करण्याचे नवीन नवीन अनोखे मार्ग शोधत राहतो. चेहऱ्यावर बनावटी हास्य आणण्यापेक्षा मी लोकांच्या चेहऱ्यावर खरी खुशाली आणि स्मितहास्य आणण्याचा सतत प्रयत्न करतो. बोटीवर बर्थडे पार्टी सेलिब्रेट करणे हे देखील सर्वांचे चेहरे आनंदाने भरण्याचे एक माध्यम आहें . आम्ही सर्व लोकांना एकत्र घेऊन, गप्पा मारत, खात, गाणी गात- ऐकत आणि डान्स करत बोटीची ही आनंदाची सफर पार पाडली! मुंबई शहरात मी ' लग्नाच्या बोटीत , लाटांच्या मस्तीत अशी नाविन्यपूर्ण शहनाईची पाण्यात

आयडिया घेऊन येत आहे, जिथे सर्व जाती-धर्मांचे अनेक विवाह मी चालत्या बोटीवर घडवून आणणार आहे."

के. रवि दादा पुढे म्हणाले की, "रमाकांत हा माझा भाऊ आहे . आमची संबंध तीन दशकांचा आहे. मी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत नाही तर प्रेम, एकता, बंधुभाव आणि सहकार्याची भावना, आपलेपणा वाढवण्यावर भर देतो. सर्वांना खुश ठेवा, प्रेम द्या, प्रेम घ्या हेच आयुष्य जगण्याचे माझे सूत्र आहे."

रमाकांत मुंडे म्हणाले की, "के. रवि दादांनी मला आपला भाऊ म्हटले आणि ते खरोखरच मला लगान भाऊ मानतात, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मुंबईतील माझ्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते माझे मार्गदर्शक आणि सहयोगी राहिले आहेत. मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो."

No comments