adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बुऱ्हानगर येथे आदिशक्ती मोफत महाआरोग्य शिबीराचे शुभारंभ

बुऱ्हानगर येथे आदिशक्ती मोफत महाआरोग्य शिबीराचे शुभारंभ अहिल्यानगर / प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रल व...

बुऱ्हानगर येथे आदिशक्ती मोफत महाआरोग्य शिबीराचे शुभारंभ





अहिल्यानगर / प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर डिग्निटी यांच्या संयुक्त विद्यमाने बुऱ्हानगर देवी, बुऱ्हानगर येथे दिनांक 11 ते 18 ऑक्टोबर 2026, सकाळी 10 ते सायंकाळी 6 या कालावधीत मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन डी वाय एस पी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रमुख पाहुणे म्हणून नाना जाधव (प्रांत संघ चालक), संपादक हनुमंतराव पाटील, पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, सीडीजी रो. शिरीष रायते, रो.डॉ. प्रकाश गरुड, रो. डॉ. प्रकाश कांकरीया, रो.डॉ. सुधा कांकरीया, रो.ॲड. अभिषेक भगत (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर डिग्निटी), रो. डॉ. वैशाली पाटील (सचिव), रो. अमर गुरप (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रल), रो. सुनील मुथा (सचिव), रो. डॉ. कुणाल कोल्हे (प्रोजेक्ट चेअरमन), रो. अभय राजे (प्रोजेक्ट समन्वयक), रो. राहुल जामगावकर (प्रोजेक्ट व्यवस्थापक), डॉ. रोहित कानडे (आयुष्यमान भारत कार्ड), डॉ. राजहंस मॅडम (प्राचार्य वाय सी डी सी डेंटल कॉलेज), अहिल्यानगर ब्लड बँक, डॉ. छाजेड (आनंद ऋषीजी नेत्रालय) आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर डिग्निटीचे अध्यक्ष ॲड.अभिषेक भगत यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करत शिबिरास शुभेच्छा दिल्या.

या शिबिरात मोफत दंत तपासणी, नेत्र तपासणी, कॅन्सर तपासणी, ब्लड, बीपी, शुगर तपासणी, आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या शिबिरात रक्तदान करणाऱ्या भाविकांना तात्काळ देवीचे दर्शन देखील देण्यात येत आहे. सर्व भाविकांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान आयोजिकांनी केले आहे.

या प्रसंगी रोटरीचे रो. सौ.उज्ज्वला रोजे, रो.सौ. कविता भगत, रो. डॉ. प्रदीप चौभे, रो.आशुतोष लांडगे, रो.दादा करंजुले, रो.डॉ. अजिता चौभे, रो. अंकुर बोरकर, रो. हर्षद मुळे, रो. श्वेता मुळे, रो. पुष्कर वैकर, रो. कश्मिरा जामगांवकर, रो. डॉ. श्रीकृष्ण जोशी, रो.सौ. वैजयंती जोशी, रो.डॉ. किर्ती कोल्हे, रो. मनिष बोरा, रो.सुनील कटारिया, रो.हरीश नय्यर, रो.चेतन अमरापूरकर, रो. ईश्वर बोरा, रो. प्रसन्न खाजगीवाले, रो. विजय जुंद्रे, रो. प्रभाकर बोगा आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलचे अध्यक्ष रो. अमर गुरप यांनी केले.अधिक माहिती साठी 9923387272 / 9860249005 / 9923284242 या नंबर वर संपर्क करण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे. 


वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार आबीद खान

अ. नगर - 9860477869


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

श्रीरामपूर - 9561174111

No comments