adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गोरगावले बु. शिक्षण प्रसारक मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.. सभेत गत संचालक मंडळाच्या गैरकारभाराबाबत चौकशीची मागणी

गोरगावले बु. शिक्षण प्रसारक मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.. सभेत गत संचालक मंडळाच्या गैरकारभाराबाबत चौकशीची मागणी चोपडा (प्रत...

गोरगावले बु. शिक्षण प्रसारक मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न..

सभेत गत संचालक मंडळाच्या गैरकारभाराबाबत चौकशीची मागणी



चोपडा (प्रतिनिधी)

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा तालुक्यातील गोरगावले बुद्रुक येथील शिक्षण प्रसारक मंडळाची समांतर कार्यकारिणीची विशेष सर्वसाधारण सभा घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर राजेंद्र माध्यमिक विद्या मंदिराच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था राखून उत्साहात संपन्न झाली. सुरूवातीला संस्थेचे दिवंगत विश्वस्त, दिवंगत सभासद, दिवंगत कर्मचारी यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक व विद्यमान चेअरमन नंदलाल पाटील हे होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर, सचिव वसंत पाटील, संचालक सुरेश पाटील, अरविंद महाजन, बाळासाहेब पाटील, मोहन कुंभार, प्रविण पाटील, रोहिदास कोळी, सुनील चौधरी, मुरलीधर कोळी, प्रताप पाटील, सचिन पाटील, जीवन पाटील, स्वप्निल पाटील यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते श्री सरस्वती देवी प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सुरेखा कोळी यांच्या शुभहस्ते सर्व संचालक मंडळाचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात अध्यक्ष नंदलाल पाटील यांनी संस्थेचा लेखाजोखा मांडला.

          सदर सभेत अजेंड्यावरील विषयांवर चर्चा करण्यात येऊन तसे ठराव संमत करण्यात आले. त्यात प्रामुख्याने गतसंचालक मंडळाने सन २०२६ ते २०३१ दरम्यानच्या कार्यकारी मंडळाची निवड विशेष सर्वसाधारण सभेतील सभासदांमधून करणे गरजेचे होते. परंतु तसे न करता मुदतीच्या काही महिने आधीच त्यांनी स्वस्वार्थासाठी घरपरिवारातील व इतर मर्जीतील सभासदांना घेऊन बेकायदेशीर कार्यकारी मंडळ स्थापन करून सभासदांच्या न्याय व हक्कांवर गदा आणलेली आहे. त्यामुळे सभासदांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले होते. ते बेकायदेशीर कार्यकारी मंडळ बरखास्त करावे व हे नवीन कार्यकारी मंडळाला कायम मंजुरी मिळावी तसेच गत संचालक मंडळाने संस्थेचे रेकॉर्ड कार्यालयात जमा करावे, असा ठराव म.धर्मदाय आयुक्त साहेब जळगाव यांचेकडे पाठविण्याचे ठरले. ऐनवेळच्या विषयांमध्ये गत संचालक मंडळाने केलेल्या मनमानी, अनागोंदी व गैरकारभाराची चौकशी व्हावी, संस्थेत मर्जीतीलच लोकांना नवीन सभासद का करण्यात आले, आजीवन सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा प्रयत्न का झाला, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या दबावतंत्राची चौकशी व्हावी, याआधी शाळा विक्रीचा प्रयत्न फसल्याने त्यावर लाख्खों रूपयांचे कर्ज काढण्याचाही प्रयत्न झालेला आहे, अनुकंप तत्वावरील व इतरही कर्मचारी भरतीत लाख्खों रूपयांचा गोपनीय व्यवहार झाल्याचे तसेच बऱ्याच उमेदवारांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळल्याची चर्चा आहे, संस्थेच्या निवडणूक काळात उमेदवारांना धाकदपटशा करून माघार घ्यायला लावणे व निवडून आलेल्या संचालकांना अश्लील शिवीगाळ करून राजीनामा देण्यास भाग पाडणे, नवीन कार्यकारिणीवर खोट्या केसेस दाखल करून मनस्ताप देणे, अशा अनेक विषयानुरूप माहिती व पुराव्यांसह निवेदन संबंधित विभागाकडे पाठविणेबाबत चर्चा करण्यात आली. त्यास सर्व सभासदांनी एकमुखाने व एकमताने संमती दिली. यापुढील काळात नवीन कार्यकारी मंडळाने खबरदारी घेऊन जबाबदारीने संस्थेचा कारभार सांभाळावा, अशाही कडक सूचना सभासदांनी केल्यात.

        याप्रसंगी गोरगावले बुद्रुक पंचक्रोशितील खडगाव, घुमावल बुद्रुक, तावसे खुर्द, घुमावल खुर्द, गोरगावले खुर्द, वडगावसिम येथील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन ज्वाईंट सेक्रेटरी तथा मुख्याध्यापक अंबर पाटील यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. यावेळी उपस्थित सभासदांसाठी स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आलेली होती.

No comments