adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

काँग्रेसचे जिल्हा सचिव कृषिरत्न दिनेश पाटील यांच्या हस्ते ॲड. व्यंकटेश यांचा सत्कार

काँग्रेसचे जिल्हा सचिव कृषिरत्न दिनेश पाटील यांच्या हस्ते ॲड. व्यंकटेश यांचा सत्कार अंतुर्ली ता. मुक्ताईनगर : किरण धायले (संपादक - हेमकांत ग...

काँग्रेसचे जिल्हा सचिव कृषिरत्न दिनेश पाटील यांच्या हस्ते ॲड. व्यंकटेश यांचा सत्कार


अंतुर्ली ता. मुक्ताईनगर : किरण धायले

(संपादक - हेमकांत गायकवाड) 

काश्मीर ते कन्याकुमारी अशी पदयात्रा काढणारे हैदराबाद उच्च न्यायालयाचे ॲड. व्यंकटेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे ‘RAGR – Rise of India Yatra’ या पदयात्रेनिमित्त महाराष्ट्रातील शेवटचे गाव असलेल्या अंतुर्ली फाटा, ता. मुक्ताईनगर येथे आगमन झाले. यावेळी काँग्रेसचे जळगाव जिल्हा सचिव तथा कृषिरत्न दिनेश पाटील यांच्या हस्ते ॲड. व्यंकटेश आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला. तसेच पुढील प्रवासासाठी मध्य प्रदेशकडे रवाना होताना त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या पदयात्रेच्या माध्यमातून देशातील शेतकरी, युवक, सुशिक्षित बेरोजगार, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ॲड. व्यंकटेश यांनी सांगितले. देशाची अखंडता, बंधुभाव आणि एकता कायम राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही केले. याप्रसंगी एलएफसीचे संचालक लुकमान सेठ, मनीष सेठ, प्रमोद देशमुख, सोनू देशमुख यांच्यासह शेतकरी, युवक, सुशिक्षित बेरोजगार आणि शेतमजूर उपस्थित होते.

No comments