डॉ. जगदीश पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यात काँग्रेस संघटनेला बळ मिळण...
डॉ. जगदीश पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती
नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यात काँग्रेस संघटनेला बळ मिळण्याची अपेक्षा
अंतुर्ली ता. मुक्ताईनगर : किरण धायले
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील डॉ. जगदीश पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यात काँग्रेस संघटनेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
डॉ. जगदीश पाटील यांनी यापूर्वी नगरपरिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी सक्रिय सहभाग घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे यांनी डॉ. जगदीश पाटील यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे डॉ. जगदीश पाटील यांना पक्षसंघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळाली असून, त्यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक मजबूत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निवडीबद्दल पक्षश्रेष्ठींचेही परिसरातून आभार मानले जात आहेत.

No comments