adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त रावेर येथे भव्य दिंडी सोहळा समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त रावेर येथे भव्य दिंडी सोहळा समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रावेर तालुका प्रतिनिधी  (स...

महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त रावेर येथे भव्य दिंडी सोहळा समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन



रावेर तालुका प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


ता.रावेर जि. जळगाव : आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्सव समिती रावेर तालुका यांच्या वतीने सोमवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण समाज बांधवांनी एकजुटीने सहभागी होऊन महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या विचारांचा आदर्शांचा आणि संस्कारांचा जागर करावा असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

हा भव्य दिंडी सोहळा सकाळी ९ वाजता छोरीया मार्केट येथून सुरू होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शनि मंदिर स्टेशन रोड, रावेर येथे पोहोचणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून समाजात एकता बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक ऐक्याची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

चला एकजुट होऊया… भक्तिभावाने दिंडीत सहभागी होऊया! या प्रेरणादायी संदेशासह उत्सव समितीने सर्व समाज बांधवांना या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक गावातून प्रत्येक कुटुंबातून आणि प्रत्येक समाज बांधवाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून दिंडी सोहळ्याची शोभा वाढवावी. आपली उपस्थिती हीच सोहळ्याची शान असून सर्वांच्या एकत्रित सहभागातून हा सोहळा भव्य आणि ऐतिहासिक व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


जयंती उत्सवातील विविध कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून श्री. ब्रिजलाल तुकाराम तायडे यांची भूमिका असून उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.


उत्सव समितीचे पदाधिकारी 

अध्यक्ष :-विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाईजी) पुनखेडा

उपाध्यक्ष :-शरद कोळी (तांदलवाडी), सुभाष सपकाळे (सुनोदा), ईश्वर तायडे (गोलवाडा)

सचिव :-भूषण तायडे (रावेर)

सहसचिव :-संतोष कोळी (गाते)

खजिनदार :-योगेश्वर कोळी (तांदलवाडी)

सहखजिनदार :-गोपाल कोळी (खिरवड)

सल्लागार :-चंद्रकांत कोळी (पुरी), सदाशिव कोळी (उदळी), हरलाल कोळी (कांडवेल), दत्तात्रय तायडे (तांदलवाडी), संतोष अप्पा कोळी (सिंगत), आत्माराम कोळी (धामोडी)


सदस्य :-विजय कोळी (अजनाड), विनोद कोळी (नेहता), संदीप महाले (निंभोरा), दीपक तायडे (लहान वाघोदा), सुपडू मोरे (थोरगव्हाण), कैलास कोळी (कांडवेल), गणेश सपकाळे (सुनोदा), विक्की कोळी (चोरवड), शुभम कोळी (निबोल), बाळू कोळी (वाघाडी), अतुल कोळी (मांगलवाडी), विजय सपकाळे (सुनोदा), किरण कोळी (अटवाडे), समाधान कोळी (पातोंडी), अशोक कोळी (लहान वाघोदा), जयराम कोळी (ऐनपूर) आणि मनोहर कोळी (सुलवाडी) समाज बांधवांना विशेष आवाहन महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती हा आपल्या श्रद्धेचा अभिमानाचा आणि सामाजिक एकतेचा उत्सव आहे. त्यामुळे सर्वांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून कुटुंबासह दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे आणि समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडवावे, असे आवाहन आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्सव समिती रावेर तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments