चोपड्यात ७ लाखांच्या कारसह गावठी कट्टा, जिवंत काडतुसे व मोबाईल जप्त; एकाला अटक चोपडा शहर पोलिसांची कारवाई; शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दा...
चोपड्यात ७ लाखांच्या कारसह गावठी कट्टा, जिवंत काडतुसे व मोबाईल जप्त; एकाला अटक
चोपडा शहर पोलिसांची कारवाई; शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल
चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरात बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी कारवाई करत एका संशयित आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ७ लाख रुपये किमतीची कार, गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या गुन्ह्याच्या तपशीलपत्रकातून समोर आली आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजता चोपडा शहरातील धनवाडी रोड, ग्रामसेवक कॉलनी परिसरातील शशिकांत नगर येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३०/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ व २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात जयेश दिलीप पाटील (वय २४ वर्षे,रा.गुजरात) याला अटक करण्यात आल्याची नोंद आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात अंदाजे ७ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची GJ.05.RK.3127 पांढऱ्या रंगाची कार,सुमारे १ लाख रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा,चार जिवंत काडतुसे आणि विविध कंपन्यांचे मोबाईल फोन यांचा समावेश आहे.
तसेच गुजरातच्या अट्टल गुन्हेगार चोपडा पोलिसांच्या ताब्यात व त्याच्यावर पाच गुन्हे दाखल ॲट्रॉसिटी पॉस्को 307 हाफ मर्डर दरोडा आणि चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये आर्म ऐक्ट गुन्हा दाखल झाला आहे तरी
पोलिसांच्या तपशीलपत्रकानुसार, कारवाईदरम्यान एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास चोपडा शहर पोलीस करीत आहेत.


No comments