adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

‘तलाक’ची धमकी देत विवाहितेचा छळ; पतीसह सात जणांविरोधात चोपड्यात गुन्हा माहेरून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा; १ लाख ५० हजार रुपये दिल्यानंतरही पैशांची मागणी सुरूच असल्याचा आरोप

‘तलाक’ची धमकी देत विवाहितेचा छळ; पतीसह सात जणांविरोधात चोपड्यात गुन्हा माहेरून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा; १ लाख ५० हजार रुपये दिल्यानंतरह...

‘तलाक’ची धमकी देत विवाहितेचा छळ; पतीसह सात जणांविरोधात चोपड्यात गुन्हा

माहेरून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा; १ लाख ५० हजार रुपये दिल्यानंतरही पैशांची मागणी सुरूच असल्याचा आरोप




अशोक कोळी चोपडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 चोपडा शहरातील एका विवाहित महिलेचा माहेरून ५ लाख रुपये आणण्यासाठी छळ केल्याप्रकरणी पतीसह सात जणांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पतीने ‘तलाक, तलाक, तलाक’ असे म्हणून तिला तलाक दिल्याचे सांगत धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

पोलीस नोंदीनुसार, हिना बी. शेख अकबर बेलदार (वय ३२), रा. ख्वाजा नगर, अमळनेर, जि. जळगाव, ह.मु. मन्यारअळी, चोपडा यांनी अकबर किस्मत बेलदार, सायरा किस्मत बेलदार, सामू रिसायत किस्मत बेलदार, जेड जाफर किस्मत बेलदार, जेठाणी फर्जाना जाफर बेलदार, नणंद शुरी किस्मत बेलदार व नणंद समरीन किस्मत बेलदार, सर्व रा. ख्वाजा नगर, अमळनेर, जि. जळगाव. यांच्या याबाबत तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, संबंधित महिलेचा विवाह झाल्यानंतर ती पती व सासरच्या मंडळींसोबत राहत होती. दि. १६ फेब्रुवारी २०२५ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपींनी संगनमताने तक्रारदारकडे माहेरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. माहेरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तक्रारदारच्या वडिलांनी तिच्या पती व जेठ यांना १ लाख ५० हजार रुपये रोख दिले होते. मात्र, त्यानंतरही पैशांची मागणी सुरूच राहिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तसेच, तक्रारदारला शिवीगाळ, मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक १ याने तक्रारदारला ‘तलाक, तलाक, तलाक’ असे म्हणून तलाक दिल्याचे सांगितले आणि तिला धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय तक्रारदारच्या माहेरी जाऊन तिच्या वडिलांचा वकिलांसमोर अपमानास्पद भाषेत उल्लेख केल्याचा तसेच धमकी दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ७.४७ वाजता चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा गु.र.नं. ४०३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेतील कलम ८५, २९६(२), १३१, ११५(२), ३५१(२), ३(५) तसेच मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण अधिनियम २०१९ चे कलम ३ अन्वये दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस कॉन्स्टेबल/अधिकारी जगन्नाथ अशोक पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला असून, पुढील तपास चोपडा शहर पोलिसांकडून सुरू आहे.

No comments