adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दुष्काळ पंचनाम्यांवरून आमदार अमोल जावळे आक्रमक

दुष्काळ पंचनाम्यांवरून आमदार अमोल जावळे आक्रमक  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक : हेमकांत गायकवाड)  फैजपूर येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयां...

दुष्काळ पंचनाम्यांवरून आमदार अमोल जावळे आक्रमक 




इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)



 फैजपूर येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांना अचानक भेट; अनावश्यक कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक न करण्याच्या सूचना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू असताना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारींची आमदार अमोल जावळे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी बामनोद व फैजपूर येथील तलाठी तसेच मंडळ अधिकारी कार्यालयांना अचानक भेट देऊन पंचनाम्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना विनाकारण कागदपत्रांसाठी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, अशा स्पष्ट सूचना आमदार जावळे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. पंचनाम्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले आधारकार्ड, डीबीटीद्वारे मदत जमा करण्यासाठी आवश्यक बँक खाते तपशील तसेच ॲग्रीस्टॅकशी संबंधित माहिती घ्यावी. मात्र, आवश्यकता नसताना ७/१२ उतारा, ८-अ यांसारख्या कागदपत्रांची मागणी करू नये, असे आमदार जावळे यांनी स्पष्ट केले. “दुष्काळामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे. कागदपत्रांच्या नावाखाली त्याची अडवणूक करू नका आणि त्याला कार्यालयांच्या फेऱ्या मारायला लावू नका. आवश्यक माहिती घेऊन पंचनामे वेळेत पूर्ण करा,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

यावेळी आमदार जावळे यांनी कार्यालयीन कामकाजासह दुष्काळ पंचनाम्यांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. रावेर-यावल मतदारसंघातील सर्व संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल कार्यालयांनी शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, अशा पद्धतीने पंचनाम्याची प्रक्रिया राबवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, अनावश्यक कागदपत्रांबाबत निर्माण झालेल्या प्रकाराची आमदार जावळे यांनी दखल घेतल्यानंतर प्रशासनाने संबंधित आदेश तत्काळ मागे घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रांच्या अटीपासून दिलासा मिळणार आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी पंचनामे पारदर्शक, सुलभ आणि विनाविलंब पूर्ण करावेत, असेही आमदार अमोल जावळे यांनी स्पष्ट केले.

No comments