adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभा वर्षावास पुष्पमाला समागम समारोप

चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभा वर्षावास पुष्पमाला समागम समारोप चोपडा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) दी.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया त...

चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभा वर्षावास पुष्पमाला समागम समारोप


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


दी.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्व अंतर्गत चोपडा तालुका यांच्या विद्यमाने राज्याच्या व जिल्ह्याच्या नियोजनानुसार आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास मालिका सुरू होती.चोपडा तालुक्यात वीस ते पंचवीस गावामध्ये वर्षावास प्रवचन मालिका पुष्प गुफाण्यात आले. आज तालुक्यात वर्षावास समागम समारोप कार्यक्रम चोपडा येथील आयु.सुभाष भावलाल वारडे यांच्याकडे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जानकीराम शंकर सपकाळे यांनी स्वीकारले.यावेळी आयु.सुभाष भावलाल वारडे, आयुनी.स्मिता सुभाष वारडे,यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच त्रिशरण,पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.*आजचा विषय बौद्ध धम्मआणि मानवता अश्विन पौर्णिमा या विषयावर प्रवचनकार आयु.राजेंद्र काशिनाथ पारे (लेखक, साहित्यिक) यांनी मालिकेतले पुष्प पूर्ण करून धम्मदेसना दिली.* यावेळी आयु.भरत भिमराव शिरसाठ(शहराध्यक्ष )व आयु.वसंत बाबुराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

      सदर वर्षावास कार्यक्रमासाठी शालिग्राम व्यंकट करंदीकर (प्रमुख,समता सैनिक दल), जानकीराम शंकर सपकाळे,वसंत बाबुराव शिंदे,आयु. महेंद्र प्रल्हाद म्हैसरे,सुकदेव लक्ष्मण बाविस्कर, सुभाष भावलाल वारडे, हिलाल यशवंत वारडे, संजय पिरा अहिरे, छोटूभाऊ वारडे ,स्मिता सुभाष वारडे, शितल भगवान वारडे, रेखा हिलाल वारडे, विमलताई जाधव, ज्योत्स्ना देवानंद वाघ,अनिल गोरख वाडे, देवानंद यशवंत वाघ,दिपक नाना भालेराव,बौद्ध उपासक- उपासीका,भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक आयु. भरत भिमराव शिरसाठ सर यांनी केले. शेवटी आभार सुभाष भावलाल वारडे यांनी मानले.

जयभीम! नमो बुद्धाय!!


No comments