adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल कास्ट्राईब शिक्षक संघटना अध्यक्ष भरत शिरसाठ

यावल कास्ट्राईब शिक्षक संघटना अध्यक्ष भरत शिरसाठ यावल प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) पंचायत समिती यावल येथील मिटींग हॉलमध्ये कास्ट्रा...

यावल कास्ट्राईब शिक्षक संघटना अध्यक्ष भरत शिरसाठ


यावल प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


पंचायत समिती यावल येथील मिटींग हॉलमध्ये कास्ट्राईब कर्मचारी संघटना तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगांव येथे आयोजित होणारे राज्यस्तरीय अधिवेशन बाबत कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीमध्ये गटविकास अधिकारी मा. मंजुषा गायकवाड गटशिक्षणाधिकारी मा. फिरोज पठाण माजी गटशिक्षणाधिकारी धनके साहेब ग. स. सोसायटीचे संचालक योगेश इंगळे भुसावळ पतपेढी संचालक श्रीकांत मोटे कास्ट्राईब संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल सुरडकर, शिक्षक संघटनेचे राज्य संघटक प्रभाकर पारवे , शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंके , जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण बागुल , कोषाध्यक्ष दीपक भोई , यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. अधिवेशन यशस्वीतेसाठी बैठकीमध्ये आव्हान करण्यात आले. बैठकीत कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष म्हणून कैलास ठोके , तर शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून भरत शिरसाठ , तसेच कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून डी.व्ही. निळे यांना नियुक्ती देण्यात आली.सदर बैठकीमध्ये बहुसंख्य शिक्षक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

No comments