देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत विद्याभारती माध्यमिक विद्यालय,विरवाडे येथील विद्यार्थ्यांचे यश विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी) (संपादक : हेम...
देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत विद्याभारती माध्यमिक विद्यालय,विरवाडे येथील विद्यार्थ्यांचे यश
विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
२ ऑक्टोबर विश्व अहिंसा दिवस निमित्त आयोजित जिल्हास्तरीय गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेत विद्याभारती माध्यमिक विद्यालय,विरवाडे ता.चोपडा येथील विद्यार्थिनींनी ग्रामीण भागातील गटातून द्वितीय क्रमांक पटकावला.या समूहगीत गायनाच्या स्पर्धेसाठी म.मुख्याध्यापक श्री.एस. एल.पाटील,संगीत शिक्षक श्री.एम.आर.सोनवणे,वसतीगृह अधीक्षक श्री.डी.आर. सोनगिरे व सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले.ही स्पर्धा दिनांक २९/९/२०२६ सोमवार रोजी रोटरी भवन जळगाव येथे घेण्यात आली होती.विजयी स्पर्धकांची नावे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे प्रधानमंत्री भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या कार्यक्रम प्रसंगी जळगाव येथील गांधी उद्यानात जाहीर करण्यात आली.विद्यालयातील यशस्वी विद्यार्थिनींचे विद्याभारती बहुउद्देशीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब श्री.पंडित चिंधू कोळी,उपाध्यक्ष भाऊसाहेब श्री.आत्माराम गोरख माळके,सचिव श्री.दीपक रामदास सिसोदिया व सर्व संचालक मंडळातील सदस्य यांनी कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


No comments