अंतुर्ली येथे ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी अंतुर्ल...
अंतुर्ली येथे ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी
अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले
(संपादक : हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली ता मुक्ताईनगर येथे ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय अंतुरली येथ राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन करताना वाचनालयाचे अध्यक्ष एस ए भोई सर, उपाध्यक्ष शरद महाजन, पोलीस पाटील किशोर मेढे,भानुदास पाटील,बारी सर,शेख भैय्या शे. करीम, उखर्डु बोरसे, भाऊराव महाजन, नामदेव भोई,शिवाजी पाटील, वाचक व मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष एस ए भोई सर यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील प्रमुख नेते जागतिक प्रतीक आणि भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. राजकोट व भावनगर येथील शामलदास कॉलेजमधील शिक्षणानंतर ते लंडनला गेले तेथे त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आणि जून 1891 मध्ये बॅरिस्टर पदवी मिळवली त्यानंतर 1893 ते 1914 अशी 21 वर्षे ते दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास होते दक्षिण आफ्रिकेतील वर्ण देशाविरुद्ध यशस्वी लढा दिल्यानंतर 9 जानेवारी 1915 रोजी ते भारतात परत ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी सत्य व आहिसेचा तत्वांचा वापर केला आणि देशातील जनतेला देशभक्तीच्या धाग्यात गुंफून अहिंसक आंदोलनाचे नेतृत्व केले त्यांच्या या नेतृत्वाने जगभरातील अनेक नागरी हक्क चळवळीला प्रेरणा दिली. आज जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन
तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती पंडित नेहरू यांच्यानंतर त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारली ते त्यांच्या साधेपणा, दूरदृष्टी आणि देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या आपल्या शुर जवानांसाठी व देशातील नागरिकांसाठी अन्नधान्य पिकवणारा आपल्या शेतकरी बांधवांच्या सन्मानासाठी दिलेल्या जय जवान जय किसान या घोषणेसाठी ओळखले जातात. 1965 च्या भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी देशाचे नेतृत्व केले तसेच देशाच्या अन्नसुरक्षासाठी हरित क्रांतीला प्रोत्साहन दिले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही विनम्र अभिवादन.
कार्यक्रम चे सूत्रसंचालन संचालक अनिल वाडीले यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथपाल मधुकर वानखेडे अनिल न्हावकर व शांताराम महाजन यांनी प्रयत्न केले.

No comments