निर्वाणा फाउंडेशनच्या वतीने अंतुर्ली गावात पाणी बचतीचा उपक्रम अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले (संपादक : हेमकांत गायकवाड) नळांना तोट्या लावून प...
निर्वाणा फाउंडेशनच्या वतीने अंतुर्ली गावात पाणी बचतीचा उपक्रम
अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले
(संपादक : हेमकांत गायकवाड)
नळांना तोट्या लावून पाण्याचा अपव्यय टाळण्याचे ॲड. प्रफुल किशोर मेढे यांचे ग्रामस्थांना आवाहन
अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर : पाण्याची बचत आणि पाण्याचा योग्य वापर याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने निर्वाणा फाउंडेशनच्या वतीने अंतुर्ली गावात नळांना तोट्या लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले.
सध्या दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, पाणी भरल्यानंतर नळ व्यवस्थित बंद करावेत तसेच नळांना तोट्या लावून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन निर्वाणा फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रफुल किशोर मेढे यांनी ग्रामस्थांना केले.
पाणी ही निसर्गाने दिलेली अमूल्य संपत्ती असून, त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आज पाण्याची बचत केली, तरच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने पाणी बचतीची सवय अंगीकारावी आणि इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अक्षय मेढे, किशोर शिरतुरे आणि विकास मेढे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे गावामध्ये पाणी बचतीचा संदेश पोहोचविण्यास मदत झाली.
निर्वाणा फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा असून, पाणी बचतीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे. फाउंडेशनचा संदेश
"पाणी वाचवा, जीवन वाचवा!
थेंब थेंब पाण्याचा, विचार करा भविष्याचा!"असा संदेश देण्यात आला.

No comments