अंतुर्लीत विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहन अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले (संपादक : हेमकांत गायकवाड) अंतुर्ली ता मुक्ताईनगर येथे छत्रपती शि...
अंतुर्लीत विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहन
अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले
(संपादक : हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली ता मुक्ताईनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज नगर जय शिवाजी मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी नगर,आदर्श मित्र मंडळ, जिरी वाडा यांच्या वतीने विजयादशमीच्य निमित्ताने रावण दहन करण्यात आले. रावण दहन हा हिंदू संस्कृतीतील एक अत्यत महत्वाचा आणि उत्सवाचा धार्मिक उत्सव आहे..हा सन दरवर्षी आश्विन महिन्यातील शुद्ध दशमीला म्हणजेच दसरा (विजयादशमी )या दिवशी साजरा केला जातो.अधमांवर धर्माचा विजय:पोराणिक कथेनुसार, याच दिवशी प्रभू श्रीरामाने लंकेचा राजा रावण याचा वध करून माता सीतेची सुटका केली होती.रावण हा अत्यंत विद्वान होता पण त्याचा अहंकार अधर्मि वागण्यामुळे त्याचा सर्वनाश झाला.रावणदहनासोबत त्याचा भाऊ कुंभकर्ण आणि त्याचा पुत्र मेघनाद (इंद्रजित )यांचे ही पुतळे जाळले जातात.हा सन आपल्याला शिकवतो कि, माणसाच्या मनातील वाईट विचार, अहंकार,आणि पापाचा शेवटी नाश होतो.विजया दशमी च्या दिवशी वाजत, गाजत पुतळ्याची मिरवणूक काढली जाते व मिरवणुकीत गावातील नागरिक, कार्यकर्ते, लहान मुले उपस्थित राहून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली, आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात रावणाचे दहन करण्यात आले.

No comments