धर्मवीर युथ फाउंडेशनच्या ‘युवा संवाद’ उपक्रमाला मलकापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद गावोगावी तरुणाईचा वाढता सहभाग; संस्थापक अध्यक्ष पृथ्...
धर्मवीर युथ फाउंडेशनच्या ‘युवा संवाद’ उपक्रमाला मलकापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
गावोगावी तरुणाईचा वाढता सहभाग; संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भैय्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाला वेग
अमोल बावस्कार मलकापूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मलकापूर : धर्मवीर युथ फाउंडेशन मलकापूर तालुका यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘युवा संवाद’ या उपक्रमाला तालुक्यातील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कुंड, धरणगाव, तांदुळवाडी, तालसवाडा, नरवेल, म्हैसवाडी, दसरखेड, वाघोळा, चिंचोल व रनथम या गावांमध्ये युवकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा, सामाजिक प्रश्न तसेच शिक्षण, रोजगार व भविष्यातील संधी याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.या उपक्रमादरम्यान धर्मवीर युथ फाउंडेशनचे तालुका प्रमुख देवा बावस्कार, तालुका उपप्रमुख अमित सोनटक्के, तालुका संघटक गणेश साठे, सचिन गर्दळ, डॉ. हनुमान भगत, युवा सेवा कार्यकारिणीचे रुद्र सूर्यवंशी व दीपक सांबरे, सुनील सांबरे, वैभव हनवते यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भैय्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, तालुक्यातील विविध गावांमध्ये युवकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. युवा शक्तीला सामाजिक कार्याशी जोडणे, गावांच्या विकासासाठी युवकांनी पुढाकार घेणे आणि समाजातील विविध प्रश्नांवर एकत्रितपणे सकारात्मक भूमिका घेणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
‘युवा संवाद’च्या माध्यमातून युवकांना आपल्या समस्या व विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. शिक्षण, रोजगार, क्रीडा, सामाजिक उपक्रम, डिजिटल युगातील संधी तसेच गावपातळीवरील विविध विकासात्मक प्रश्नांवर युवकांशी संवाद साधला जात आहे.“तरुणाई हीच परिवर्तनाची खरी ताकद आहे. युवकांनी एकत्र येऊन समाजासाठी काम केले, तर गावाचा आणि तालुक्याचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो,” या विचारातून धर्मवीर युथ फाउंडेशनकडून विविध सामाजिक उपक्रमांना चालना दिली जात आहे.गावोगावी राबविण्यात येत असलेल्या ‘युवा संवाद’ उपक्रमामुळे धर्मवीर युथ फाउंडेशनच्या सामाजिक कार्याला युवकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, तालुक्यातील युवा शक्तीला संघटित करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. आगामी काळात मलकापूर तालुक्यातील अधिकाधिक गावांमध्ये ‘युवा संवाद’ उपक्रम राबवून युवकांशी थेट संपर्क वाढविण्यात येणार असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.

No comments