adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकरी प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; तहसीलदार साहेबांच्या दालनात दोन तास ठिय्या. स्वाभिमानीचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे.

 शेतकरी प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; तहसीलदार साहेबांच्या दालनात दोन तास ठिय्या. स्वाभिमानीचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे...

 शेतकरी प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; तहसीलदार साहेबांच्या दालनात दोन तास ठिय्या.

स्वाभिमानीचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे. 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर : मलकापूर व नांदुरा तालुक्यासह महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, प्रलंबित पीक विमा, नवीन पीक कर्ज आणि शेतीच्या वीजपुरवठ्यासह विविध प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मलकापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून NDRFच्या निकषांच्या व्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक सहाय्य तातडीने द्यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच मागील वर्षाचा आणि चालू वर्षाचा पीक विमा तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी करण्यात आली. नवीन पीक कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांवर लावण्यात येणाऱ्या सिव्हिल स्कोअर, हेल्थ इन्शुरन्स आणि इतर अनावश्यक अटी दूर करून सुलभ पद्धतीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी संघटनेने केली

मार्च २०२६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मका पिकाचे झालेले नुकसान आणि त्याचे प्रलंबित नुकसान अनुदान तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावे, तसेच अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींचे रखडलेले अनुदान त्वरित वितरित करावे, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, मलकापूर व नांदुरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील चोरीला गेलेल्या विजेच्या तारा तात्काळ बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा, तसेच भविष्यात अशा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी संबंधित विभागाला आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. या सर्व मागण्यांवर शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, मलकापूर तालुकाध्यक्ष गोपाल सातव, नांदुरा तालुकाध्यक्ष रामदास डोसे, मलकापूर युवक तालुकाध्यक्ष निंबाजी तायडे यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.

No comments