adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निहारिका कोळी मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा यावल तहसीलदारांना आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने निवेदन; मूक मोर्चा

 निहारिका कोळी मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा यावल तहसीलदारांना आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने निवेदन; मूक मोर्चा  भरत कोळी यावल (स...

 निहारिका कोळी मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा

यावल तहसीलदारांना आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने निवेदन; मूक मोर्चा 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात १५ वर्षीय निहारिका अनिल कोळी हिचा झालेला संशयास्पद मृत्यू अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी यावल तालुका आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने यावल तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकी संघापासून तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चाही काढण्यात आला.

यावल येथील शेतकी संघात जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या उपस्थितीत यावल तालुका आदिवासी टोकरे कोळी जमात बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत निहारिका कोळी हिच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी करण्यात आली.

त्यानंतर शेतकी संघापासून यावल तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार अतुल गांगुर्डीकर यांना निवेदन देऊन निहारिका कोळी मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी प्रभाकर आप्पा सोनवणे, नितीन सपकाळे यांनी मनोगत व्यक्त करून घटनेची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि निहारिका कोळीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी केली.

मोर्चा मध्ये यावल तालुका आदिवासी टोकरे कोळी जमातीचे पदाधिकारी प्रभाकर आप्पा सोनवणे , सुभाष सोनवणे, अविनाश तायडे, कुदनभाऊ सोनवणे, नितिन सपकाळे, संदिपभैया सोनवणे, रोहीदास कोळी, भागवत कोळी, कैलास सपकाळे , संतोष सोनवणे, महेद्र सपकाळे, भरत कोळी, गोकुळ कोळी,अनिल कोळी, सुरज कोळी, राहुल कोळी, विजय कोळी, शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थ्यीनी पालक, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments