अखेरचा तुला हा दंडवत..! मृत्यूनंतरही देहदानातून 'ज्ञानदान' आदर्श शिक्षक : अनिष्ट प्रथांना विरोध करत कृतीतून जपला पुरोगामी विचारांच...
अखेरचा तुला हा दंडवत..! मृत्यूनंतरही देहदानातून 'ज्ञानदान'
आदर्श शिक्षक : अनिष्ट प्रथांना विरोध करत कृतीतून जपला पुरोगामी विचारांचा वारसा.
लातूर, जि. प्र. (उत्तम माने, 8484878818)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
रेणापूर : आपल्या यांनी देहदानाचा निर्णय घेतला समाजात मृत्यूनंतरच्या धार्मिक विधींना खूप महत्त्व आहे; परंतु अंतिम संस्काराच्या पारंपरिक पद्धतींना बाजूला ठेवून देहदानाचा निर्णय घेणे, हे अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे
लक्षण आहे. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मानवी शरीराची रचना प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी मानवी देहाची अत्यंत गरज असते.
देहदानामुळे या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अभ्यासाची संधी मिळते. ज्यामुळे ते भविष्यात उत्तम डॉक्टर बनून हजारो रुग्णांचे प्राण वाचवू शकतात. म्हणूनच देहदानाला 'ज्ञानदान' म्हटले गेले आहे. हाच सुधारणावादी विचारांचा वारसा जपत रेणापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक मधुकर कोतवाड
होता. मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडावे, या भावनेतून त्यांनी देहदानाचा संकल्प करणाऱ्या मधुकर रघुनाथराव कोतवाड (६५) सरांचे मंगळवारी (१३ ऑक्टोबर) निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार नातेवाइकांनी पार्थिव लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागाकडे सुपूर्द केले. वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीररचनेचा अभ्यास करता यावा, यासाठी त्यांच्या देहाचा उपयोग होणार आहे. आयुष्यभर ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाने मृत्यूनंतरही ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवले. त्यांच्या पश्चात भाऊ प्रल्हाद व अंगद, पत्नी, मुलगी आणि मुले श्रीकांत व पवन असा परिवार आहे.
मुलाच्या विवाहात हुंडा न घेता आदर्श निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व
आजच्या आधुनिक काळातही हुंड्याची प्रथा पूर्णपणे नष्ट झालेली नाही. अशा परिस्थितीत हुंडा न घेता आणि न देता विवाह करणे, हा समाजासमोर एक मोठा आदर्श ठरतो. हुंड्यासाठी मुलीच्या पालकांना कर्ज काढावे लागते. ज्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडतात. हुंडामुक्त विवाहामुळे वधू पक्षावरील हा मानसिक आणि आर्थिक ताण पूर्णपणे दूर होतो, याचे भान ठेवत मधुकर कोतवाड यांनी मुलाच्या विवाहात हुंडा न घेता विवाहाचा खर्च स्वतः केला होता. अनिष्ट प्रथांना विरोध करत त्यांनी कृतीतून पुरोगामी विचारांचा आदर्श घालून दिला. साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि सामाजिक बांधिलकी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते.

No comments