राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या जिल्हास्तरीय बैठकीत स्थानिक प्रश्नांवर चर्चा कोमल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश महिला कार्याध्यक्षपदी, तर जितें...
राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या जिल्हास्तरीय बैठकीत स्थानिक प्रश्नांवर चर्चा
कोमल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश महिला कार्याध्यक्षपदी, तर जितेंद्र चौधरी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जळगाव येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय जनमंच पक्षाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत स्थानिक ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठविणे, सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणे आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने कोमल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश महिला कार्याध्यक्षपदी, तर जितेंद्र चौधरी यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास आर. वाघ यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.
राष्ट्रीय जनमंच पक्षाचे विचार व धोरणे घराघरांत पोहोचविण्यासोबतच संघटनात्मक मजबुती वाढवून पक्षाचा विस्तार करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
जळगाव जिल्ह्यातील गावोगावी पक्षाच्या शाखा स्थापन करून संघटनात्मक कार्याला गती द्यावी, अशी सूचना प्रदेश सचिव लांडगे यांनी केली. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश राठोड यांनीही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षाचे काम जोमाने करण्याचे आवाहन केले. बैठकीच्या शेवटी जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद डोंगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या बैठकीला उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश राठोड, जळगाव जिल्हा शेतकरी आघाडी अध्यक्ष विजय पाटील, जळगाव महानगर अध्यक्ष संतोष बाविस्कर (राधे बाबा), जिल्हा सचिव अमृत सैंदाणे, जिल्हा संघटक गोकुळ अहिरे, एरंडोल तालुकाध्यक्ष रोहिदास सूर्यवंशी, चोपडा तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे, चाळीसगाव तालुका दिव्यांग आघाडीचे महेंद्र बागुल यांच्यासह रवींद्र महाजन, विलास शिंदे, कैलास जोशी, पुंडलिक महाजन, आदित्य चौधरी, भैय्यासाहेब निकम तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments