पुढे शारदीय नवरात्रौत्सव येत असल्याने ग्रामस्थांद्वारे लोकवर्गणीतून रस्ता दुरुस्त वरवंडी ग्रामस्थांची आदर्शवत कामगीरी जावेद शेख / राहुरी ...
पुढे शारदीय नवरात्रौत्सव येत असल्याने ग्रामस्थांद्वारे लोकवर्गणीतून रस्ता दुरुस्तवरवंडी ग्रामस्थांची आदर्शवत कामगीरी
जावेद शेख / राहुरी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वरवंडी गाव या रस्त्याची ग्रामस्थांद्वारे लोकवर्गणीतून दुरुस्ती करण्यात आली.
सदरील हा रस्ता प्रचंड रहदारीचा असुन गावातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे.परंतू या रस्त्याची फारच दयनीय अवस्था झाली होती, वाहन चालकांसमवेत पादचाऱ्यांना देखील या रस्त्यावरुन वाहन चालवणे व चालणे मोठे जिकिरीचे झाले होते, करीता गावातील तरुण वर्ग तथा समस्त ग्रामस्थ यांनी एकत्र येत लोकवर्गणीच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात या रस्त्याची दुरुस्ती केली आहे, येत्या रविवार दि.11 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे.
पंचक्रोशीत जागरुक देवस्थान असलेल्या लक्ष्मी माता मंदिर दर्शनासाठी याच रस्त्याने गावातील सर्व भाविक भक्त, महिला भगीनी ये - जा करीत असतात त्यामुळे भाविक भक्त तथा महिला भगिनींची गैरसोय होऊ नये यासोबतच गावातील प्रत्येक नागरिक, विद्यार्थी, यांच्यासाठीही या रस्ता अत्यंत उपयुक्त आहे. करीता गावातील तरुण वर्ग तथा ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हा रस्ता दुरुस्त करून एक आदर्श निर्माण केला असल्याचे बोलले जात आहे.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments