सेवा संकल्प अभियानांतर्गत यावल येथे रांगोळी स्पर्धा ५२ स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; कीर्ती नन्नवरे प्रथम यावल प्रतिनिधी (संपादक : हेमकां...
सेवा संकल्प अभियानांतर्गत यावल येथे रांगोळी स्पर्धा
५२ स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; कीर्ती नन्नवरे प्रथम
यावल प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
यावल : भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत शुक्रवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री व्यास मंदिर, यावल येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
नगरसेविका शुभांगीताई रोशन येवले, नगरसेविका सविताताई विजय नन्नवरे, नगरसेविका कल्पनाताई दिलीप वाणी व रोशन येवले यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. खुल्या गटातील या रांगोळी स्पर्धेत यावल शहरातील तब्बल ५२ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेत प्रथम क्रमांक कीर्ती नन्नवरे, द्वितीय क्रमांक वनिता समाधान भोईटे, तृतीय क्रमांक वैष्णवी अतुल यादव, तर उत्तेजनार्थ फाल्गुनी यादव यांनी मिळविला. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कलाध्यापक विजय नन्नवरे सर यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गोपाल मांढरे, उपेंद्र फालक तसेच श्री व्यास मंदिर यावल संस्थान यांचे सहकार्य लाभले.

No comments