घाडवेल ग्रामपंचायतील राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी घाडवेल प्रतिनिधी अशोक कोळी (संपादक : हेमकांत गायकवाड) घाडवेल ग्रामपंच...
घाडवेल ग्रामपंचायतील राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
घाडवेल प्रतिनिधी अशोक कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
घाडवेल ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्या प्रशासक म्हणून नियुक्त झालेल्या शिरसाट मॅडम यांच्या उपस्थितीत गांधी जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमानंतर प्रशासक शिरसाट मॅडम यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली. तसेच गावातील अंगणवाड्यांचीही पाहणी करून तेथील व्यवस्था, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा व आवश्यक बाबींची माहिती घेतली. गावाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या काही विषयांवर चर्चा करून ते अमलात आणण्याबाबत पुढाकार घेण्यात आला.
यावेळी ग्रामसेवक भाऊसाहेब, अंगणवाडी सेविका, सुनिता कंखरे अंगणवाडी पर्यवेक्षिका पत्रकार अशोक कोळी नरेंद्र पाटील विकास कोळी मदतनीस, शिपाई व इतर कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायत प्रशासनाकडून शाळा, अंगणवाडी व गावातील मूलभूत सुविधांकडे प्रत्यक्ष पाहणी करून लक्ष दिल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.


No comments