adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापूर शहर पोलिसांचीं अवैध धंद्यांवर धडक कारवाई सप्टेंबर महिन्यात ४९३ वाहनचालकांवर कारवाईसह लाखो रुपयांचा दंड वसूल

मलकापूर शहर पोलिसांचीं अवैध धंद्यांवर धडक कारवाई सप्टेंबर महिन्यात ४९३ वाहनचालकांवर कारवाईसह लाखो रुपयांचा दंड वसूल मलकापूर  (संपादक : हेमका...

मलकापूर शहर पोलिसांचीं अवैध धंद्यांवर धडक कारवाई

सप्टेंबर महिन्यात ४९३ वाहनचालकांवर कारवाईसह लाखो रुपयांचा दंड वसूल


मलकापूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच बेकायदेशीर धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मलकापूर शहर पोलिसांनी सप्टेंबर महिन्यात विशेष धडक मोहीम राबवली. पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या एका महिन्याच्या कालावधीत गुन्हेगार आणि नियम मोडणार्‍यांवर धडाकेबाज कारवाया करण्यात आल्या असून यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

अमली पदार्थांची खरेदी-विक्री व तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी सतर्कता दाखवत एनडीपीएस कायद्यांतर्गत १ गुन्हा दाखल करून एका आरोपीला रंगेहात अटक केली. यासोबतच बेकायदेशीर गोवंश वाहतुकीवर कारवाई करत गोवंश संरक्षण कायद्यान्वये १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच शहरात उघड्यावर चालणार्‍या अवैध धंद्यांवर पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकले. यात जुगार कायद्यांतर्गत ६ केसेस नोंदवून २ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच बेकायदेशीर दारूविक्री करणार्‍यांवर दारूबंदी कायद्यान्वये ६ कारवाया करत ८ हजार ५३० रुपयांचा प्रोव्ही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबध्द करण्यासाठी पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम तीव्र केली आहे. या कालावधीत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्‍या, ट्रिपल सीट, विनाहेल्मेट व कागदपत्रे नसणार्‍या तब्बल ४९३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून पोलिसांनी एकूण ३ लाख १२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.


शहरात शांतता व सुव्यवस्था राखणे आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करणे हे पोलीस प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. गुन्हेगारी कारवाया आणि अवैध व्यवसाय करणार्‍यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहील. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि परिसरात कुठलाही अवैध प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

— गणेश गिरी पोलीस निरीक्षक, मलकापूर शहर

No comments