राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या वतीने कार्यवाहीची मागणी चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी (संपादक : हेमकांत गायकवाड) जळगाव. सह आयुक्त नगरपालिका जळगाव दुष्...
राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या वतीने कार्यवाहीची मागणी
चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जळगाव. सह आयुक्त नगरपालिका जळगाव दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका आयुक्तांच्या केबिन मधील एसी काढण्यात यावा राष्ट्रीय जनमंच पक्षाची मागणी
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जळगाव नगरपालिका सह आयुक्त जनार्दन पवार यांच्या केबिन मधील एसी तात्काळ काढण्यात यावा एसीच्या वीज वापरण्याची चौकशी करून त्यांच्या खर्च नियमानुसार संबंधितांकडून वसूल करण्यात यावा वसूल झालेली रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात यावी आणि दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता शासकीय कार्यालयांमध्ये अनावश्यक वीज वापरण्यास प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या वतीने निवेदन द्वारे जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे करण्यात आली आहे निवेदनाची गंभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी अन्यथा राष्ट्रीय जनमंच पक्षाच्यावतीने आंदोलनाच्या इशारा देण्यात आला आहे निवेदन द्वारा प्रदेश सचिव संदीप लांडगे. जिल्हाध्यक्ष प्रमोद डोंगरे. संतोष बाविस्कर. यश कुमावत इत्यादी सह्या आहेत.

No comments