मुक्ताईनगर तालुका विज्ञान प्रदर्शनात जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे घवघवीत यश! प्रज्वल बऱ्हाटे प्रथम, यशिता खुळे द्वितीय; दोन्ही विद्यार्थ्...
मुक्ताईनगर तालुका विज्ञान प्रदर्शनात जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे घवघवीत यश!
प्रज्वल बऱ्हाटे प्रथम, यशिता खुळे द्वितीय; दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतिश गायकवाड
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुका विज्ञान प्रदर्शनात जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इयत्ता ११ वीचा विद्यार्थी प्रज्वल संजय बऱ्हाटे याने ‘ओव्हर स्पीड अलर्ट सिस्टिम’ या वैज्ञानिक उपकरणाच्या सादरीकरणातून इयत्ता ९ वी ते १२ वी गटात प्रथम क्रमांक पटकावला. तर इयत्ता ७ वीची विद्यार्थिनी कु. यशिता अजय खुळे हिने ‘स्मार्ट डोअर गारबेज व्हॅन’ या उपकरणाच्या सादरीकरणातून इयत्ता ६ वी ते ८ वी गटात द्वितीय क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे, या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता आणि मेहनतीमुळे हे यश मिळाले आहे. या यशामध्ये मार्गदर्शक शिक्षक के. व्ही. जंगले,प्रसाद खर्चे,अर्चना झांबरे, लीना पाटील आणि भाऊसाहेब अजय खुळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे सर्वेसर्वा आमदार एकनाथराव खडसे, संस्थेच्या चेअरमन ॲड. रोहिणी खडसे, उपाध्यक्ष नारायणराव चौधरी, सचिव डॉ. सी. एस. दादा चौधरी व सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
तसेच विद्यालयाचे प्राचार्य विकास चौधरी, उपमुख्याध्यापिका वंदना शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे, के. आर. कवळे, एस. एम. वाढे आणि सर्व शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांचे कौतुक करून आगामी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक व वैज्ञानिक उपक्रमांना नवी प्रेरणा मिळाली असून, जिल्हास्तरीय प्रदर्शनातही दोन्ही विद्यार्थी उज्ज्वल कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

No comments