आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते गुणी विद्यार्थ्यांचा गौरव... चोपडा दि.१० ( संजीव शिरसाठ) (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा विधान...
आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते गुणी विद्यार्थ्यांचा गौरव...
चोपडा दि.१० ( संजीव शिरसाठ)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा विधानसभा मतदारसंघांचे कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते तालुक्यातून कला परिक्षेत प्रथम ,व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अडावद येथे नुकताच पार पडला. विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी कु.ईशिता महेश शिरसाठ हिस आमदार महोदयांनी प्रमाणपत्र देऊन गौरव करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी करीष्मा नायर, गटविकास अधिकारी अंजली बर्ग, गटशिक्षणाधिकारी अजित पाटील, केंद्र प्रमुख दीपक पाटील, विवेकानंद विद्यालयाचे तंत्र स्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते यांच्यासह प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियान पंचायत समिती चोपडा अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.त्याअनुषंगाने तालुकास्तरीय कला परिक्षा आयोजित करण्यात आली होती त्यात इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी कु.ईशिता महेश शिरसाठ हिने द्वितीय क्रमांक पटकावित चुणूक दाखवली .या गुणवंत विद्यार्थ्यांचा अडावद येथील क्षत्रिय माळी समाज सभागृहात आयोजित भव्य समारंभात आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या गुणवंतांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

No comments