adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलच्या रक्तदान शिबिरात ६० जणांचे रक्तदान

  रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलच्या रक्तदान शिबिरात ६० जणांचे रक्तदान  अहिल्यानगर / प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड)  रोटरी क्लब ऑफ अ...

 रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलच्या रक्तदान शिबिरात ६० जणांचे रक्तदान 



अहिल्यानगर / प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


 रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रल, समर्थ हायड्रॉलिक अँड पॉवर सिस्टिम व अष्टविनायक ब्लड सेंटर, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने क्लबचे संचालक व ज्येष्ठ रोटेरियन विजय जुंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयडीसी, अहिल्यानगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठया संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिरात ६० रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या.

या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलचे अध्यक्ष रो. अमर गुरप, सचिव रो.सुनील मुथा, क्लबचे चार्टर व ज्येष्ठ रोटेरियन डॉ. श्रीकृष्ण जोशी, सौ. वैजयंती जोशी, ग्लोबल ग्रँट डायरेक्टर रो. हरीश नय्यर, ह्यूमन डायरेक्टर रो. राजूभाई गुजर, आयपीपी रो. सुनील कटारिया, डायरेक्टर रो. हितेश गुप्ता, रो. प्रसन्न खाजगीवाले, रो. चेतन अमरापूरकर,रो. गिरीश मुळे, रो. विनोद बोरा, रो. निवृत्ती झिने, रो. प्रभाकर बोगा आदी रोटेरियन उपस्थित होते.

तसेच रो.विजय जुंद्रे यांचे मित्रपरिवार, नातेवाईक व समर्थ हायड्रॉलिक अँड पॉवर सिस्टिमच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले.

यावेळी सर्वांनी रो. विजय जुंद्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. शिबिर यशस्वी करण्यासाठी अष्टविनायक ब्लड बँकेच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. त्याबद्दल क्लबच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.


वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार आबीद खान 

 अ.नगर - 9860477869



वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

श्रीरामपूर - 9561174111

No comments