मंगरूळ विद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी) (संपादक : हेमकांत गायकवाड) गांधी रिसर्च फाउंडेशन,गांधी ...
मंगरूळ विद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन
विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
गांधी रिसर्च फाउंडेशन,गांधी तीर्थ,जैन हिल्स,जळगाव यांच्या वतीने आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षा २०२६ परीक्षेचे आयोजन श्रीमती अ.खा.पाटील माध्यमिक विद्यामंदिर मंगरूळ (ता चोपडा) येथे करण्यात आले.
या परीक्षेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये महात्मा गांधीजींचे सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि स्वावलंबन या विचारांचे संस्कार रुजवणे हा होता.
एकूण ५१ विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला.
यावेळी स्थानिक सल्लागार समितीच्या अध्यक्षा श्रीमती वृषालीताई देशमुख उपस्थित होत्या.मुख्याध्यापक प्रशांत गरुड, समन्वयक बी.यु.जाधव श्रीमती कविता इंगळे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतेले......मंगरूळ(ता चोपडा) परीक्षेत उपस्थित विद्यार्थी


No comments