"जि प च प्राथमिक उर्दू कन्या शाळा नं१ एक वाचन प्रेरणा दिवस साजरा" चोपडा प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) जि प प्राथमिक उर्...
"जि प च प्राथमिक उर्दू कन्या शाळा नं१ एक वाचन प्रेरणा दिवस साजरा"
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जि प प्राथमिक उर्दू कन्या शाळा नं १ चोपडा जि जळगाव येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती व त्यांच्या संघर्ष वाचनामुळे त्यांच्या जीवनात झालेला अमुलाग्र बदल विषयी आत्तार अमीन सर यांनी माहिती दिली.
मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी मुलांना उर्दू मासिक उमंग सखोल परिचय देण्यात
आला व आपण अत्यंत अल्पदरात म्हणजे आठ रुपये प्रतिमा हा खर्च करून हा मासिक कसा लावू शकतो याविषयी सखोल माहिती खालीद जकी सर यांनी दिली तसेच आपल्या शहरात असलेली सर सय्यद उर्दू वाचनालय व तेथे येणारे विविध उर्दू मासिक याविषयी सुद्धा माहिती देण्यात आली
यापूर्वी वाचन क्षमता वाढविण्यासाठी शाळेत अनेक उपक्रम राबविण्यात आलेले आहे.
निपुण भारत अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना गुलजारे उर्दू ही पुस्तक मोफत वाटप करण्यात आली.
मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी व मराठी वाचन मुलांना करता यावा यासाठी माझी मराठी हा पुस्तक सुद्धा मोफत वाटप करण्यात आला
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद यांनी मेहनत घेतली.

No comments