adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चहार्डीच्या खेळाडूंचे जिल्हा पातळीवर सुयश

  चहार्डीच्या खेळाडूंचे जिल्हा पातळीवर सुयश चोपडा तालुका प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) चहार्डी ता. चोपडा- येथील भाऊसाहेब शामराव शिवर...

 चहार्डीच्या खेळाडूंचे जिल्हा पातळीवर सुयश



चोपडा तालुका प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चहार्डी ता. चोपडा- येथील भाऊसाहेब शामराव शिवराम पाटील विद्यालयाच्या खेळाडूंनी महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे , जळगाव जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत सुयश प्राप्त केले . १७ वर्षा आतील वयोगटात लांब उडी क्रीडा प्रकारात नकुल कोळी याने द्वितीय क्रमांक मिळवून विभागीय स्तरासाठी आपले स्थान पक्के केले . तसेच १९ वर्षातील वयोगटात तेजस पाटील यांनी लांब उडी क्रीडा प्रकारात तृतीय स्थान पटकावले .या यशाबद्दल खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील ,उपाध्यक्ष डॉ.पराग पाटील ,सचिव प्रकाश पाटील . शालेय समितीचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सहसचिव जे. डी. चौधरी, मुख्याध्यापक शरद जगताप, उपमुख्याध्यापक पी. बी. पाटील, पर्यवेक्षक जे. डी. सोनवणे, व शिक्षकांनी अभिनंदन केले .खेळाडूंना शिक्षक जितेंद्र महाजन व स्वाती चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments