adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये लुटमार करुन प्रवाशांना मारहाण करणाऱ्या भामट्यांवर कठोर कारवाई व्हावी - समाजवादी पार्टी ची मागणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित रेल्वे पोलिसांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात यावी - जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार कारवाई न झाल्यास महाराष्ट्रात रेल्वे रोको आंदोलन छेडण्याचा समाजवादी जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांचा इशारा

महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये लुटमार करुन प्रवाशांना मारहाण करणाऱ्या भामट्यांवर कठोर कारवाई व्हावी - समाजवादी पार्टी ची मागणी कर्तव्यात कसूर करण...

महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये लुटमार करुन प्रवाशांना मारहाण करणाऱ्या भामट्यांवर कठोर कारवाई व्हावी - समाजवादी पार्टी ची मागणी

कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित रेल्वे पोलिसांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात यावी - जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार

कारवाई न झाल्यास महाराष्ट्रात रेल्वे रोको आंदोलन छेडण्याचा समाजवादी जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांचा इशारा


श्रीरामपूर / प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


कोपरगांव रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेसमधील प्रवाशांना मारहाण करून सोन्याचे दागिने लुटल्याचा गंभीर आरोप समाजवादी पार्टीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष जोएफ युनूस जमादार यांनी केला आहे. या घटनेवेळी रेल्वे पोलीस उपस्थित असूनही त्यांनी प्रभावी हस्तक्षेप केला नसल्याचा आरोप करत संबंधित आरोपींसह दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी वरिष्ठ रेल्वे व लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता ट्रेन क्रमांक ११०४० महाराष्ट्र एक्सप्रेसच्या एस-५ डब्यात ही घटना घडल्याचे निवेदनात म्हटले आहे. जळगांव ते श्रीरामपूर प्रवास करणाऱ्या महिला, मुले व पुरुष प्रवाशांना मारहाण करून त्यांचे दागिने लुटल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल चित्रीकरणाच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, तसेच दोषींवर निलंबनासह कठोर कारवाई करावी, अशी मागणी जमादार यांनी केली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेची हमी देऊन या प्रकरणात तातडीने कारवाई करावी; अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

निवेदन देतेवेळी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, शाहरुख क़ुरैशी, याकूब शाह,अबरार शेख, फिरोज क़ुरैशी,अफरोज़ शाह,मोसिन शेख, अक्रम शाह, समीर सैय्यद, फिरोज शाह,अय्यूब शाह, रेहान शाह,शोएब शाह, रफीक शाह, मोसिन क़ुरैशी, हुसैन क़ुरैशी आदि उपस्थित होते.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments