adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगावमध्ये 'मुख्यमंत्र्यांचा आरोग्य संवाद' कार्यक्रम उत्साहात संपन्न

  जळगावमध्ये 'मुख्यमंत्र्यांचा आरोग्य संवाद' कार्यक्रम उत्साहात संपन्न जळगाव येथील "मुख्यमंत्र्यांचा आरोग्य संवाद" कार्यक्...

 जळगावमध्ये 'मुख्यमंत्र्यांचा आरोग्य संवाद' कार्यक्रम उत्साहात संपन्न


जळगाव येथील "मुख्यमंत्र्यांचा आरोग्य संवाद" कार्यक्रमात प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले विद्यार्थ्यांना संबोधित करताना. तसेच प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील डॉ. आदित्य पाटील यांचे स्वागत करताना.

लियाकत शाह जळगांव

(संपादक : हेमकांत गायकवाड)


गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील मूलभूत विज्ञान आणि मानविकी विभागाने, डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, जळगाव खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने, १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी 'मुख्यमंत्र्यांचा आरोग्य संवाद' या विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन केले. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. 'आजची निरोगी पिढी, उद्याचा विकसित भारत!' या बोधवाक्याला अनुसरून, तरुण विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, व्यसनमुक्ती आणि राष्ट्र उभारणीतील सहभाग याबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

प्रमुख मार्गदर्शक आणि सत्रे

कार्यक्रमादरम्यान तज्ज्ञ वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले यांनी युवाशक्ती, कौशल्य विकास, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, निरोगी आणि जबाबदार तरुण पिढी घडवणे, तसेच सामाजिक बदलांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग यावर मार्गदर्शन केले. निरोगी जीवनशैली आणि राष्ट्रउभारणी यावर बोलताना, नोडल अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांनी विकसित भारतासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, व्यसनमुक्त जीवन आणि युवकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. आशिष येवले यांनी मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंध, तणावमुक्त जीवन, भावनिक संतुलन, योग्य मार्गदर्शन आणि आधार, तसेच निरोगी मन राखण्याचे मार्ग यावर चर्चा केली.

कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन

प्राध्यापक नेहा चौधरी, प्रा. आकाश मुरई, प्रा. हर्षा पाटील, प्रा. सायली जांगले, प्रा. सचिन चिंचोले, प्रा. हिमांशू निकम, प्रा. नितीन पाटील आणि प्रा. दीपक झांबरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शेवटी, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी "जागरूक राहा, तयार राहा, सुरक्षित राहा" या संदेशासह कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी कौतुक व्यक्त केले.

No comments