निलेश बाळू चोपडे यांची ‘दिव्यांग योद्धा समाजभूषण पुरस्कार २०२७’ साठी निवड! मलकापूरच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची दखल मलकापू...
निलेश बाळू चोपडे यांची ‘दिव्यांग योद्धा समाजभूषण पुरस्कार २०२७’ साठी निवड!
मलकापूरच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची दखल
मलकापूर, प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मलकापूर येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते निलेश बाळू चोपडे यांची ‘न्यायहक्क समताशाही दिव्यांग योद्धा समाजभूषण पुरस्कार २०२७’ साठी निवड झाली आहे. लोकसेवा शिक्षण व क्रीडा बहुउद्देशीय संस्था, मातृतीर्थ मेहकर, जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले आहे.
निलेश बाळू चोपडे हे साप्ताहिक ‘आपलं मलकापूर’चे संपादक, दैनिक ‘विदर्भद्वार न्यूज’चे सहसंपादक तसेच ‘दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही ते योगदान देत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
दैनिक न्यायहक्क समताशाही व साप्ताहिक जानेफळ एक्सप्रेस यांच्या वर्धापन दिनानिमित्त या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
निलेश बाळू चोपडे यांच्या निवडीमुळे मलकापूरच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात आनंद व्यक्त होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments