कलेच्या माध्यमातून नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली चित्रकार सुनील दाभाडे यांनी कुंचल्यातून साकारले नाना पाटेकर यांचे भावस्पर्शी चित...
कलेच्या माध्यमातून नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
चित्रकार सुनील दाभाडे यांनी कुंचल्यातून साकारले नाना पाटेकर यांचे भावस्पर्शी चित्र
जळगाव प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जळगाव : आपल्या कलेच्या माध्यमातून विविध व्यक्तिमत्त्वांना आदरांजली वाहणारे जळगाव येथील मानव सेवा विद्यालय कलाशिक्षक तथा चित्रकार सुनिल दाभाडे यांनी सिनेअभिनेते नाना पाटेकर यांचे सुंदर व भावस्पर्शी चित्र रेखाटून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
चित्रकार सुनिल दाभाडे यांनी रंग, रेषा आणि कुंचल्याच्या माध्यमातून नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील भावभावना प्रभावीपणे चित्रित केल्या आहेत. त्यांच्या या कलाकृतीतून नाना पाटेकर यांच्या अभिनयाची आणि व्यक्तिमत्त्वाची छाप अधोरेखित होत असल्याचे दिसून येते.
“कलेच्या माध्यमातून एखाद्या महान व्यक्तिमत्त्वाला आदरांजली अर्पण करणे, हीच एका कलाकाराची खरी भावना आहे,” अशा भावनेतून सुनिल दाभाडे यांनी हे चित्र साकारले. त्यांच्या या कलाकृतीचे कला क्षेत्रातील रसिकांकडून कौतुक होत आहे.
कुंचल्यातून उमटलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली नाना पाटेकर यांच्या चाहत्यांच्या मनाला निश्चितच स्पर्श करणारी ठरत आहे.

No comments