adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे टी महाजन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फैजपूरचे क्रीडाक्षेत्रात सुमित मेढे यांचे दैदिप्यमान यश

  जे टी महाजन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फैजपूरचे क्रीडाक्षेत्रात सुमित मेढे यांचे दैदिप्यमान यश  इदू पिंजारी फैजपूर  [संपादक - हेमकांत गायकवाड] फ...

 जे टी महाजन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फैजपूरचे क्रीडाक्षेत्रात सुमित मेढे यांचे दैदिप्यमान यश 


इदू पिंजारी फैजपूर 

[संपादक - हेमकांत गायकवाड]

फैजपूर डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी लोणेरे अंतर्गत दि.९ व १० ऑक्टोबर २०२६ रोजी NKSPT इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बदनापूर,जालना येथे वेट लिफ्टिंग आंतर विभागीय निवड स्पर्धा घेण्यात आल्या.

जे. टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेज फैजपूरचा तृतीय वर्ष कॉम्पुटरचा विद्यार्थी सुमित संदीप मेढे याने ७५ किलो वजन गटात स्नॅच १०० किलो व क्लीन अँड जर्क मध्ये १२० किलो असे एकूण २२० किलो वजन उचलून डी.बाटू लोणेरे विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावून जे. टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांच नाव देश पातळीवर उंचावण्यास सज्ज झाला आहे.अखिल भारतीय पातळीवरील पुढील स्पर्धा गुजराथ येथे होणार आहे.

सुमित मेढे यास महाविद्यालयीन स्तरावर गौरवांन्वित करून पुढील स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष  शरद दादा महाजन, उपाध्यक्ष  उल्हासशेठ चौधरी , सचिव  विजय झोपे, सहसचिव  शशिकांत चौधरी इतर सन्माननीय संचालक, प्राचार्य डॉ. के जी पाटील, उपप्राचार्य डॉ. जी ई चौधरी, सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच क्रीडा शिक्षक  विकास महाजन उपस्थित होते.

No comments