adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रखडलेला पीक विमा व दुष्काळी अनुदान दिवाळीपूर्वी द्या; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

  रखडलेला पीक विमा व दुष्काळी अनुदान दिवाळीपूर्वी द्या; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेद...

 रखडलेला पीक विमा व दुष्काळी अनुदान दिवाळीपूर्वी द्या; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन


अमोल बावस्कर बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर : मागील वर्षाचा व चालू वर्षाचा रखडलेला पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक सहाय्य वितरित करावे, अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मागील वर्षापासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रलंबित पीक विम्याची रक्कम तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच यंदाच्या हंगामातील पीक कापणी प्रयोग पारदर्शक व योग्य पद्धतीने राबवावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळण्यास अडचण निर्माण होणार नाही, अशी भूमिका संघटनेने मांडली.

यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत वितरित करावी आणि आगामी रब्बी हंगामासाठी आवश्यक बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, अशा मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन रखडलेला पीक विमा व दुष्काळी आर्थिक सहाय्य तातडीने वितरित करावे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष रामदास वाघ, नांदुरा तालुकाध्यक्ष रामदास डोसे, चेतन गटमने, सुरेश बोंद्रे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.

No comments