adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मॅसानिक लॉजच्या खरेदी विक्री न करण्याचे जिल्हाधिकारी मुद्रांक यांचे आदेश

  मॅसानिक लॉजच्या खरेदी विक्री न करण्याचे जिल्हाधिकारी मुद्रांक यांचे आदेश    भुसावळ प्रतिनिधी [संपादक - हेमकांत गायकवाड] भुसावळ - येथील गट ...

 मॅसानिक लॉजच्या खरेदी विक्री न करण्याचे जिल्हाधिकारी मुद्रांक यांचे आदेश   



भुसावळ प्रतिनिधी

[संपादक - हेमकांत गायकवाड]

भुसावळ - येथील गट नं.100च्या मिळकती तसेच इतर मिळकती संदर्भात तथाकथीत कागदपत्रांच्या माध्यमाने खरेदी व विक्री होणारे अनाधिकारी व बेकायदेशीर व्यवहारापासून सर्व सामान्य जनतेस सावध राहण्याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ सानप यांनी तक्रार दिली होती. यावर सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी यांनी चौकशी करून तहसीलदार भुसावळ यांनी मिळकतीचे अभिलेख तपासून शर्त भंग झाला असल्यास पुढील कार्यवाही करावी व तहसीलदार भुसावळ यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत वाद मिळकत व मॅसेनिक लॉजच्या इतर मिळकतीचे व्यवहार होवू नये यासाठी सदर मिळकती प्रतिबंधीत करण्यात याव्या असे आदेश दिलेले आहेत.

याबाबत श्री.सानप यांनी दिलेल्या तक्रारीत भुसावळ परिसरात आपला देश स्वातंत्र्यापूर्वी ख्रिश्चन व पारसी समाजाची ट्रस्टच्या नावाने मोक्याच्या जागेवर अनेक महत्वाच्या मिळकती आहेत. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर त्या समाजाच्या ट्रस्ट बंद पडून सक्रीय नसल्याचे दिसून येत आहे. ख्रिश्चन व पारसी समाज भुसावळात अल्पसंख्य असल्यामुळे सदरची जागा आजरोजी [बेवारस ] लावारिस अवस्थेत पडलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक तथाकथीत  बोगस बनावट लोक या सदरच्या जागेच्या संदर्भात खोटे व बनावट दस्तऐवज तयार करून सदरची मिळकत त्यांना खरेदी विक्री करण्याचा अधिकार असल्याचा दावा करून तसेच सरकारी कर्मचारी यांच्या सोबत संगनमत असून खरेदी विक्रीचे व्यवहार करित असल्याचे समोर आले आहे. येथील खडका रोडवर असलेली मिळकतीबाबत व्यवहार झाला असुन याबाबत कोर्टात वाद सुरू असल्याचे समजले आहे. नुकतेच भुसावळ येथील तापी नदीच्या काठावर असलेले गट नं. 100 संदर्भात अनिल क्रिस्ट्रोफर नायर या  नावाच्या तथाकथीत इसमाने मॅसानिक लॉज या संस्थेच्या नावाने असलेली मिळकती संदर्भात दिपक पितांबर टेकवाणी  नावाने जनरल मुख्त्यारपत्र करून देवून त्या आधारावर  ईश्वर श्रीराम पाटील वगैरे या इसमांना अनधिकृतपणे व बेकायदेशीर खरेदीखत करून दिले आहे. सदरची खरेदीखत करून देत असतांना मा. दुय्यम निबंधक भुसावळ यांनी सुध्दा सदरची मिळकत या तथाकथित इसमांच्या नावावर कशी आली तसेच त्यांच्या मालकी हक्काबाबत जाणूनबुजून सोयीस्कर दुर्लक्ष करून बाजारभाव पेक्षा अत्यंत कमी किंमतीत खरेदीखत नोंदविले आहे. याबाबत श्री.सानप यांनी वकिलामार्फत संबंधितांना नोटीस सुध्दा दिलेली होती. या तक्रारीची दखल घेत सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी यांनी चौकशी करून तहसीलदार भुसावळ यांनी मिळकतीचे अभिलेख तपासून शर्त भंग झाला असल्यास पुढील कार्यवाही करावी व तहसीलदार भुसावळ यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत वाद मिळकत व मॅसेनिक लॉजच्या इतर मिळकतीचे व्यवहार होवू नये यासाठी सदर मिळकती प्रतिबंधीत करण्यात याव्या, असे आदेश दिलेले आहेत.  

No comments