adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घाडवेल गावात बिबट्यासदृश हिंस्र प्राण्याचा वावर; बैलावर हल्ला, ग्रामस्थांमध्ये भीती

  घाडवेल गावात बिबट्यासदृश हिंस्र प्राण्याचा वावर; बैलावर हल्ला, ग्रामस्थांमध्ये भीती स्मशानभूमीजवळील गोठ्यात पहाटेची घटना; वनविभागाने तातडी...

 घाडवेल गावात बिबट्यासदृश हिंस्र प्राण्याचा वावर; बैलावर हल्ला, ग्रामस्थांमध्ये भीती

स्मशानभूमीजवळील गोठ्यात पहाटेची घटना; वनविभागाने तातडीने पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी  


 अशोक कोळी घाडवेल

(संपादक - हेमकांत गायकवाड)

चोपडा :  तालुक्यातील घाडवेल गाव परिसरात बिबट्यासदृश हिंस्र प्राणी दिसून आल्याची माहिती समोर आली असून, या प्राण्याने गावालगत असलेल्या गोठ्यात बैलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. पहाटे सुमारे ४ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास स्मशानभूमीजवळील गोठ्यात ही घटना घडल्याने ग्रामस्थ आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय दौलत पाटील यांच्या गोठ्यातील बैलावर एका हिंस्र प्राण्याने हल्ला केला. यावेळी काही ग्रामस्थांना हा प्राणी दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्राणी नेमका बिबट्या आहे की अन्य कोणता हिंस्र प्राणी, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

घाडवेल परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या दोन घटना घडल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. वारंवार हिंस्र प्राण्याचा वावर आढळत असल्याने शेतकरी, पशुपालक आणि शेतात कामासाठी पहाटे जाणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी तसेच पहाटे घराबाहेर पडताना नागरिकांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. या घटनेची वनविभागाने तातडीने दखल घेऊन घटनास्थळाची पाहणी करावी, प्राण्याच्या वावराचे ठसे व इतर पुरावे तपासावेत आणि संबंधित प्राण्याची ओळख निश्चित करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच नागरिक आणि पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी विजय दौलत पाटील यांनी केली आहे. गावालगत हिंस्र प्राण्याचा वावर असल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी वनविभाग आणि संबंधित प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, संबंधित प्राण्याची अधिकृत ओळख आणि घटनेची खातरजमा होणे आवश्यक असून, वनविभागाच्या पाहणीनंतरच याबाबत अधिक स्पष्ट माहिती समोर येऊ शकणार आहे.

No comments