जळगावमध्ये महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचे स्मरण जळगाव येथे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती सोहळ्यात उपस्थित...
जळगावमध्ये महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचे स्मरण
जळगाव येथे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती सोहळ्यात उपस्थित असलेले प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्राध्यापक आणि विद्यार्थी.
लियाकत शाह जळगांव
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी आणि तंत्र महाविद्यालयात २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेवर पुष्पहार अर्पण करण्यात आले.
महाविद्यालयातील डॉ. अनिल कुमार, प्राध्यापक अमित म्हस्कर आणि प्राध्यापक प्रवीण सोनावणे यांनी आपले विचार मांडले. त्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री तसेच राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल सांगितले.
प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले की, गांधी जयंतीचे महत्त्व केवळ त्यांची जयंती साजरी करण्यातच नाही, तर सामाजिक न्याय आणि शांततेसाठी असलेले त्यांचे नेतृत्व आणि दृढनिश्चय ओळखण्यातही आहे. त्यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी माहिती देताना, "मूर्ती लहान, कीर्ती महान"" या उक्तीचा पुनरुच्चार केला.
महात्मा गांधींचा जयंती दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. ते असेही म्हणाले की, आपण सर्वांनी अशा महान व्यक्तीचे विचार आणि गुण आत्मसात केले पाहिजेत. याप्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments