छत्रपती शिवाजी हायस्कूल, कठोरा येथे गांधी जयंती आणि शास्त्री जयंती उत्साहात साजरी! अडावद प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) येथून जवळच...
छत्रपती शिवाजी हायस्कूल, कठोरा येथे गांधी जयंती आणि शास्त्री जयंती उत्साहात साजरी!
अडावद प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
येथून जवळच असलेल्या कठोरा ता चोपडा येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, कठोरा येथे २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात : यावेळी
प्रतिमा पूजन: कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. हे पूजन शाळेचे मुख्याध्यापक . सुनील पाटील यांच्या हस्ते झाले.
विद्यार्थ्यांची मनोगत : या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यानी आपल्या ओघवत्या वाणीने दोन्ही महापुरुषांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यामध्ये भावेश पाटील, दर्शन पाटील, केतकी पाटील आणि देवयानी धनगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन: व आभार संदिप . अहिरे यांनी मानले
स्वच्छता अभियान: जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून शाळेचा परिसर स्वच्छ केला, ज्यामुळे स्वच्छता अभियानाचा संदेश प्रत्यەकात उतरवला गेला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
फोटो कॅब्शन कठोरा ता चोपड़ा येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त मुख्याध्यापक एस पी पाटील सर्व शिक्षक व शिक्षिका आदी मान्यवर

No comments